Employees Provident Fund act 1952 आज दिनांक 27 मे 2024 रोजी सफेद झंडा कामगार संघटनेचा माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
Also Read : पर्यटकांच्या गराड्यात अडकला ताडोब्याचा वाघ
चंद्रपूर जिल्ह्य़ातील भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, व इतर सर्व पेट्रोल पंपवरील कार्यरत असलेले कर्मचारी यांना पेट्रोल पंप मालक थातूर मातुर पगार देऊन त्या गोरगरीब कर्मचाऱ्यांवरती अन्याय अत्याचार करत आहे.
Employees Provident Fund act 1952 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.) ही १९५२ मध्ये नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. कर्मचारी किंवा कामगार काम करीत असलेल्या आस्थापनांमध्ये निवृत्ती पश्चात कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहीले जाते. कर्मचारी आणि त्याचा मालक आस्थापना दरमहा मूळवेतनाच्या बारा टक्के रक्कम या निधीत प्रत्येकी जमा करतात. जेणेकरून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्तीसमयी एक रकमी लाभ मिळावा.
Employees Provident Fund act 1952 परंतु पेट्रोल पंप मालक या कर्मचाऱ्यांचा देण्यात येणार्या मासिक वेतनातून भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ) कपात करत नाही आणि भरत सुध्दा नाही. म्हणून आज सफेद झंडा कामगार संघटना अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की लवकरात लवकर या सर्व पेट्रोल पंप कर्मचार्यांचा EPF कपात करून त्यांचा PF खात्यात जमा करावा.
अवश्य वाचा : पाण्याच्या शोधात रानगवा शहरात
चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व पेट्रोल व डिझेल वितरण कंपनी, अस्थापना यांना कामगार भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात यावा. असे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.