Encroachment remove : घुग्गुस शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात

Encroachment remove चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस शहरात नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तपणे 28 मे रोजी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली.

अवश्य वाचा : चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात होणार हा मोठा बदल

Encroachment remove मागील काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिष्ठान धारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात नोटीस बजावले होते, त्यानुसार आज सकाळी पोलीस विभाग व नगर परिषदेने चांदणी चौक परिसरात रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानाचे अतिक्रमण काढणे सुरू केले.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार हिम्मत दाखविणार काय?

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे, आज चांदणी चौक, बस स्थानक परिसरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यावर शहरातील अनेक भागात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गादेवार यांनी दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!