Gopani Aryan Power Company चंद्रपूर ताडाळी एम.आय.डी.सी.स्पंज आर्यण कामगार संघटनेच्या वतीने गोपाणी आर्यण पावर कंपनीचे कामगार वामन सिडाम यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.
हे ही वाचा : शिक्षणाधिकारी यांची आमदाराने केली तक्रार
वामन सिडाम यांचे दि. दि ४ /१/ २०२४ रोजी अकस्मात निधन झाले होते. त्यांचे वय ४५ वर्षे होते.
ते कंपनीत १५ – २० वर्षांपासून काम करत होते. ते एक निष्ठावान आणि परिश्रमी कामगार होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
पर्यटनाचा अतिउत्साहीपणा – पर्यटकाने केला ताडोबा जंगलात अतिउत्साहीपणा, दंड ठोठावला
Gopani Aryan Power Company या पार्श्वभूमीवर ताडाळी एम.आय.डी.सी.स्पंज आर्यण कामगार संघटनेने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. संघटनेच्या अध्यक्ष मा. दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या सर्व सभासदांनी एकत्रितपणे ७९२०० रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नी व मुलीला दिला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष. श्री. दिनेशभाऊ चोखारे, उपाध्यक्ष श्री. मोहन वाघमारे, महासचिव श्री. संतोष बांदुरकर, कार्याध्यक्ष श्री. तुळशिराम डेरकर, कोषाध्यक्ष श्री. सदाशीव चतुर, सहकोषाध्यक श्री. दशरथ रोगे, विजय मोरे, रमेश आरपेल्ली, नंदु टोंगे, सागर कन्नीरवार, विकास आवारी, संतोष खोब्रागडे, महेश जुनघरे यांची उपस्थीत होते.
या आर्थिक मदतीमुळे वामन सिडाम यांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.