guaranteed pension plan शिक्षण पूर्ण झालं की युवा नोकरीच्या शोधात लागतो, चांगलं पॅकेज मिळाव यासाठी आजचा युवा चांगलाच धडपडतो, मात्र म्हातारपणात आपल्या आयुष्याच्या कमाईने आपली शेवटचं आयुष्य चांगलं जावं यासाठी अनेकजण पेन्शन प्लॅन मध्ये गुंतवणूक करतात.
अवश्य वाचा – RTE शिक्षणाचा अधिकार ऑनलाइन पोर्टल या तारखेला होणार पुन्हा सुरू
guaranteed pension plan जे आयुष्याच्या शेवट आपण सुखी जीवन जगू याची आशा बाळगत आजचा युवा वर्ग उद्याची गुंतवणूक करीत आहे, आज आपल्याला आम्ही अश्याचं काही पेन्शन प्लॅन बद्दल माहिती देणार आहो, जे तुम्हाला पेन्शनची हमी देणार आहे.
अटल पेन्शन योजना
या योजनेत 18 ते 40 वर्षांपर्यंतचे नागरिक गुंतवणूक करू शकतात. या योजनेत वयाची 60 वर्षे झाले की गुंतवणूकदाराला 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते. 18 ते 40 वर्षाच्या कालावधीत तुम्ही किती गुंतवणूक करता, यावरून तुम्हाला किती पेन्शन द्यायचे हे ठरवले जाते.
एसडब्ल्यूपी मध्ये म्यूच्यूअल फंड
एसडब्ल्यूपी म्हणजे सिस्टेमॅटिक विदड्रॉअल प्लॅन. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला महिन्याला निश्चित पेन्शन मिळू शकते. बाजारातील चढ-उताराचा या योजनेवर परिणाम पडतो. म्हणूनच बाजारात मोठी घसरण झाल्यास तुम्ही गुंतवलेले पैसे बुडू शकतात.
सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम
guaranteed pension plan सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची शासकीय योजना आहे. एकूण पाच वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 8.2 टक्क्यांनी व्याज मिळते. या योनजेत कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेत प्राप्तिकराच्या कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर करबचतीचा फायदा मिळतो.
पोस्ट ऑफिस मासिक पेन्शन योजना
ही एक पोस्ट ऑफिसची मासिक पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत पाच वर्षांपर्यंत पेन्शन मिळवता येते. या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर 7.4 टक्के व्याज मिळते. या योजनेत कमीत कमी 9 लाख आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत एका व्यक्तीला जास्तीत जास्त 5,550 रुपये मासिक पेन्शन मिळते. जॉइंट अकाउंट असेल तर अशा खात्यांवर जास्तीत जास्त 9,250 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. Post Office Monthly Pension Scheme