Illegal hoardings in chandrapur शहरातील जेवढेही अवैध होर्डिंगधारक आहेत त्यांनी त्यांचे अवैध होर्डिंग २४ तासाच्या आत काढले नाही तर त्यांच्यावर निष्कासनाची तसेच दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.
अवश्य वाचा : महावीतरणची AI सेवा सुरू
Illegal hoardings in chandrapur मुंबई येथील होर्डिंग दुर्घटना पार्श्वभुमीवर अवैध होर्डिंगसंबंधी आढावा बैठक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली मनपात आयोजीत करण्यात आली होती. शहरातील जेवढेही अवैध होर्डिंगधारक आहेत त्यांना मनपातर्फे होर्डिंग काढण्याच्या नोटीस यापुर्वी बजावण्यात आल्या आहेत. मात्र आता २४ तासाच्या आत जर होर्डिंगधारकांनी त्यांचे अवैध होर्डिंग काढले नाही तर मनपातर्फे निष्कासनाची तसेच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
अवश्य वाचा : RTE चा घोळ संपला, आता प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू
निष्कासनाची कारवाई करतांना जो काही खर्च लागेल तो या होर्डिंगधारकांकडुन वसूल केला जाणार आहे.
महानगरपालिका हद्दीत डिजिटल पोस्टर्स, जाहिरातीची होर्डिंग, बॅनर उभारतांना मनपाकडून रीतसर परवानगी घेऊन यासंबंधी आकारण्यात येणारा टॅक्स भरणे आवश्यक असते.
मात्र अनेकदा परवानगी न घेता होर्डिंग उभारण्यात येते व आवश्यक ती काळजी न घेतल्यास अपघात होण्याची शक्यता असते.