interrupted Power supply : तर वीज देयकांची करणार होळी, युवक कांग्रेसचा महावितरणला इशारा

गुरू गुरनुले interrupted Power supply मुल:- तालुक्यातील बेंबाळ परिसरातील विद्युत पुरवठा ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार खंडित होत असल्याने या परिसरातील जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच या परिसरातील उद्योगधंद्यावरही याचा मोठा परिणाम पडत आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर मनपाच्या 58 सेवा ऑनलाइन

interrupted Power supply मागील कित्येक वर्षापासून विद्युत पुरवठा खंडित होण्याचा त्रास या परिसरातील जनतेला सहण करावा लागत आहे. याबाबत युवक काँग्रेसने तक्रार ,निवदने दिलेले असूनसुद्धा याकडे संबंधित विद्युत विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.

कामाची माहिती : घरबसल्या काढा विवाह नोंदणी प्रमाणपत्र

interrupted Power supply या क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारीही आपल्या कर्तव्यात कसूर करताना आढळून येत असून ही बाब अतिशय गंभीर असून सामान्य जनतेसाठी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची आहे. वारंवार खंडित होणारा पुरवठा सुरळीत करून ग्राहकांना सर्वसामान्य जनतेला सततच्या होणाऱ्या त्रासापासून दिलासा द्यावा करिता युवक काँग्रेस कडून निवेदन देण्यात आले.

पाऊस कधी येणार? मान्सूनचे आगमन कधी?

जर एका आठवड्याच्या आत सदर विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर या विरोधात युवक काँग्रेस विद्युत कार्यालयासमोर विद्युत बिले जाळुन तीव्र आंदोलन करणार असा इशारा युवक काँग्रेसकडून देण्यात आला.

 

interrupted Power supply निवेदन देताना युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे,पवन निलमवार, कांग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील वाढई,बेंबाळचे सरपंच चांगदेवजी केमेकार, उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार, किशोर नंदिग्रामवार, माजी सरपंच विजय बोम्मावार, संदिप मस्के, निलेश बांगरे, गणेश निलमवार, विनोद वाढई,दिपक कोटगले तथा काँग्रेसचे कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!