Irai River Watershed पुढील महिन्यात पावसाळा सुरु होणार असुन यंदा सरासरीपेक्षा ज्यास्त पावसाची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आली आहे.या अधिक पावसामुळे पूरपरिस्थिती उद्भवू नये यादृष्टीने जिल्हा प्रशासन,जलसंपदा विभाग व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे इरई नदी जलपात्राची स्वच्छता सुरु करण्यात आली आहे.
अवश्य वाचा : चंद्रपूर मनपा हद्दीतील मांस विक्रेत्यांवर होणार कारवाई
Irai River Watershed पावसाळ्यात इरई नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी पात्रात असलेल्या गाळामुळे ते पाणी आपल्या नैसर्गिक प्रवाहाने न वाहता शहराच्या उतार भागात पसरते व पूरसदृश परिस्थीती निर्माण होते. नदी पात्र उथळ होतो कारण त्यात झाडे – झुडपे,जमा असलेला कचरा,गाळ,वाळुची बेटे तयार होतात व ते पाण्याला अवरोध निर्माण करतात.
Irai River Watershed यंदा इरई नदीचा पाणी प्रवाह सुरळीत राहावा यासाठी २३ मे पासुन नदी पात्र स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.स्वच्छतेचे कार्य ९ किलोमीटर लांबीच्या नदीपात्रात सुरु असुन यासाठी ११ जेसीबी – पोकलेन कार्यरत आहेत.
अवश्य वाचा : चंद्रपुरात उष्णतेची लाट
ठिकठिकाणी वाळुची बेटे निर्माण झाली आहेत ती काढण्याचे काम सुरु आहे,शिवाय अनेक झाडे – झुडपे व मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पोकलेनद्वारे स्वच्छ केल्या जात आहे. काम वेगाने सुरु झाले असुन १८ दिवसात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दररोज ५०० मीटर या वेगाने काम सुरु असुन पावसाळ्यापुर्वी इरई नदी पात्र स्वच्छ होऊन पूरपरिस्थितीस आळा बसणार आहे.