Maharani Ahilyabai Holkar Jayanti : चंद्रपुरात त्रिशताब्दी जयंती महोत्सव होणार साजरा

Maharani Ahilyabai Holkar Jayanti यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे आहे. या शुभपर्वाचे औचित्य साधून त्यांच्या महत्कार्याची जाणीव जागृती व्हावी यासाठी चंद्रपूर येथील त्रिशताब्दीय जयंती समारोह नागरी समितीच्या वतीने यंदा वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

थोडक्यात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जाहीर केली ही इच्छा

Maharani Ahilyabai Holkar Jayanti या महोत्सवाचा शुभारंभ येत्या 31 मे रोजी शोभायात्रेने होणार असून, त्यानंतर महोत्सवाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते, तर शिवशंभू विचार मंचाचे संयोजक सुधीर थोरात यांच्या विशेष उपस्थितीत होईल, अशी माहिती मार्गदर्शक तुषारजी देवपूजारी, समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. राजेश इंगोले, डॉ. अंजली हस्तक, घनश्याम दरबार यांनी पत्रपरिषदेत देण्यात आली.

अवश्य वाचा : मतमोजणी साठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज

शुक्रवार, 31 मे रोजी सायंकाळी 5 वाजता येथील गांधी चौकातून भव्य शोभायात्रा निघेल. यात्रेत पारंपारिक नृत्य, ढोल ताशे आणि लेझिम पथकासह विविध देखावे राहतील. या भव्य शोभायात्रेचा समारोप येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाच्या परिसरात होईल. सायंकाळी 7 वाजता याच सभागृहात महोत्सवाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असून, डॉ. प्रशांत बोकारे, सुधीर थोरात यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरी समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे व अन्य मान्यवर उपस्थितीत राहतील.

महत्त्वाचे : चंद्रपुरात उष्णतेची लाट

Maharani Ahilyabai Holkar Jayanti आपल्या दैदीप्यमान जीवनकार्याने स्त्री जन्माची महानता सिध्द करणार्‍या, भारताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या प्रजाहितदक्ष न्यायप्रिय राज्यकर्त्या, राजमाता, लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाची सार्थकता या महोत्सवातून विशद होणार आहे. हा त्रिशताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी समितीचे गठण करण्यात आले असून, त्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रपरिषदेला सुनील पोराटे, संगीता पोतले, प्रतिभा काळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

2 जून रोजी भव्य रक्तदान शिबीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने येत्या 2 जून रोजी येथील आयएमए सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. हा त्रिशताब्दी महोत्सव असल्याने 300 जणांचे रक्तदान यावेळी होणार असल्याचेही सांगण्यात आले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!