Maharashtra monsoon update : मे महिन्यातचं होणार मान्सूनचे आगमन

Maharashtra monsoon update वर्ष 2024 मध्ये उन्हाळ्यात पाऊस, थंडी व उकड्याचा अनुभव नागरिकांनी अनुभवला, मात्र आता वातावरणात पुन्हा बदल झाल्याने राज्यात पुन्हा उष्णतेची लाट आली आहे, राज्यातील विविध भागांतील तापमानाने 44 डिग्री सेल्सिअस चा टप्पा गाठला आहे, मात्र उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिक व शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पुढे आली आहे.

अवश्य वाचा : 17 मे पासून RTE अंतर्गत सुरू होणार प्रवेश प्रक्रिया

Maharashtra monsoon update दरवर्षी मानसून हा 21 मे च्या सुमारास अंदमानात दाखल होत असतो. यंदा मात्र लवकरच मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असल्याने मान्सून अंदमानात दोन दिवस आधी म्हणजेच 19 मे च्या सुमारास दाखल होणार असे म्हटले जात आहे.

 

भारतीय हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे, अंदमानात यंदा 13 मे ला रात्री उशिरा मान्सूनच्या हालचाली तयार होण्यास सुरुवात झाली होती. मग पुढे 14 मे ला या हालचालींना आणखी वेग आला.

अवश्य वाचा : भरघोस पेन्शन हवी तर मग आताच करा या योजनेत गुंतवणूक

Maharashtra monsoon update यामुळे आता मान्सून अंदमानत 19 मे च्या सुमारास दाखल होऊ शकतो असे हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान खात्याचा हा अंदाज मंगळवारी समोर आला आणि त्यानंतर या वर्षी केरळमध्ये देखील लवकरच मान्सूनचे आगमन होणार असे बोलले जाऊ लागले.

 

यामुळे खरंच यंदा मान्सूनचे केरळमध्ये वेळेआधीच आगमन होणार का ? आपल्या महाराष्ट्रातही मान्सून वेळेआधीच पोहोचणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच संदर्भात जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

 

Maharashtra monsoon update खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून अंदमानात 18 मेपर्यंत, तर केरळात 31 मे रोजीच दाखल होण्याची शक्यता अधिक जाणवत आहे. हेच कारण आहे की, यंदा मान्सूनसाठी खूपचं लवकर अनुकूल स्थिती तयार झाली आहे. मान्सूनच्या वार्‍यांचा वेग प्रचंड वाढला आहे.

 

त्यामुळे मान्सून वेळेआधीच अंदमान व केरळात दाखल होऊन महाराष्ट्रात देखील वेळेआधीच येण्याची शक्यता आहे. निश्चितच ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंद वार्ता राहणार आहे. मान्सूनचे वेळेआधी आगमन झाले तर शेती कामांना वेग येणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!