Marriage Certificate online registration : घरबसल्या एका क्लिकवर निघणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र

Marriage Certificate online registration आज तंत्रज्ञानाच्या युगात कुठलेही कागदपत्रे सहज उपलब्ध काढता येते, अशीच एक ऑनलाइन प्रक्रिया आम्ही आज तुम्हाला सांगणार आहो.

अवश्य वाचा : या दिवशी जाहीर होणार वर्ग 10 व 12 वीचा निकाल

लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुला-मुलीचे आयुष्य पूर्णपणे बदलते. लग्न झाल्यानंतर नावापासून ते इतर महत्त्वाच्या कागदपत्रांवर अनेक गोष्टी बदलतात. त्यातील महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे विवाह प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र बनवण्याचे इतर अनेक फायदे देखील आहेत. पण हे बनवण्याचे कसे? यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे? ऑनलाइन प्रोसेस काय? जाणून घ्या सविस्तर..

अवश्य वाचा : rte अंतर्गत अर्ज भरण्यास सुरुवात, 31 मे शेवटची तारीख

आवश्यक कागदपत्रे

Marriage Certificate online registration● वधु आणि वर यांच्या वयाचा पुरावा
• टी. सी. ( शाळा सोडल्याचा दाखला )
जन्माचा दाखला
• १० वी / १२ वी चे प्रमाणपत्र ( सनद )
• वाहन परवाना
• पासपोर्ट इत्यादी पैकी कोणतेही एक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
● वधू आणि वर यांचे पासपोर्ट साईज फोटो – दिनांकासह
● वधु व वर यांचा विवाह प्रसंगाचा फोटो
● तीन साक्षीदार, तिन्हीही साक्षीदारांचे पासपोर्ट साईज फोटो – दिनांकासह
● वर, वधू आणि साक्षीदार यांचा विवाह पूर्वीचा राहण्याचा पुरावा – (कोणतेही एक सांक्षाकीत झेरॉक्स )

● आधार कार्ड
● मतदान ओळखपत्र
● लाईट बिल / फोन बिल
● शासकीय ओळखपत्र
● वाहन परवाना
● पासपोर्ट
● राशन कार्ड
● डॉमेसाईल प्रमाणपत्र इत्यादी पैकी कोणतेही एकाचे झेरॉक्स
● मूळ लग्नपत्रिका (नसेल तर विहित नमुन्यात १०० /- रु. च्या नोटराईज बॉंड पेपर वर शपथपत्र)
● विवाहची नोंदणी या पूर्वी कुठेही झालेली नसल्याबाबत विहित नमुन्यात १०० /- रु. च्या नोटराईज बॉंड पेपर वर शपथपत्र.
● अर्जासह जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळप्रत
● वधू आणि वर दोन्ही च स्पेसिफिक फॉरमॅट मध्ये अफिडेवीट्स
● वर व वधू विधवा / विधुर असतील तर अश्या प्रकरणात जोडीदार चे मृत्यू प्रमाणपत्र.
● १०० ते २०० रुपये फी

अवश्य वाचा : पोलीस भरती मध्ये शासनाची नवी अट, त्रासदायक

Marriage Certificate online registration असा करा ऑनलाईन अर्ज

● यासाठी तुम्हाला https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या साइटला भेट देऊन साइन अप करुन पुढील प्रोसेस फॉलो करावी लागेल.
● पुढच्या वेब पेजवरती तुम्ही तुमचा जिल्हा,तुमचा तालुका आणि तुमची ग्रामपंचायत निवडा.यानंतर तुम्ही पतीचे पूर्ण नाव टाका, नंतर तुमचे लग्न कोठे झाले आणि कोणत्या तारखेला झाले याची अचूक माहिती भरा.
● यानंतर तुम्ही पतीचा आधार कार्ड नंबर अचूक टाका. यानंतर तुम्ही पत्नीचे पूर्ण नाव आणि पत्नीचा आधार कार्ड नंबर टाका.

 

 

Marriage Certificate online registration वरील योग्य माहिती भरल्यानंतर तुम्ही सबमिट(Submit) पर्यायवरती क्लिक करा.
● यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक भेटेल.
पुढच्या वेब पेज वरती तुम्हाला पर्सनल माहिती संबंधी डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात.
● इथे तुम्हाला दिलेल्या संबंधित माहिती प्रमाणे पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करावा लागतो.
● या अपलोड केलेल्या पासपोर्ट साईझ फोटोची साईझ ५kb ते २०kb च्या दरम्यान असावी. (२०kb च्या वरील पासपोर्ट साईझ फोटो लग्न प्रमाणपत्र अर्जासाठी ग्राह्य धरला जात नाही आणि तुम्हाला पुढचे पेज ओपन करता येत नाही.)

 

● तुम्ही नवरी मुलगी आणि नवरा मुलगा दोघांचे पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करा.
● पासपोर्ट साईझ फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही अपलोड डॉक्युमेंट वर क्लिक करा.
● त्यानंतर तुम्ही पेमेंटच्या पेज वर गेलात की जेवढी फी विवाह प्रमाणपत्र काढण्यासाठी लागते तेवढी फी तुम्ही यु.पी.आई, ATM किंवा नेट बँकिंगवरून भरू शकता.
● पेमेंट केल्यानंतर तुम्ही दोन -पाच दिवसांनी APLE SARKAR पोर्टल वरती भेट द्या. तुम्ही जर योग्य अर्ज भरला असेल तर तुम्हाला वेब पेजवर विवाह प्रमाणपत्र दिसेल. तिथून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.
● डाऊनलोड केलेल्या फाईलची तुम्ही कलर प्रिंट काढा.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!