Rashtriya Obc Mahasangh : ओबीसींच्या महाधिवेशनात घेणार हा महत्वाचा ठराव

Rashtriya Obc Mahasangh दिनांक ७ ऑगस्ट २०२४ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर, पंजाब राज्यात आयोजीत करण्यात आले आहे.

ताडोब्याची बातमी :अखेर त्या नरभक्षक वाघाला वनविभागाने पकडले

Rashtriya Obc Mahasangh सदर अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने चंद्रपुर येथे रविवार दिनांक १९ मे २०२४ रोजी बैठकीचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपुर येथे दुपारी ३ वाजता कऱण्यात आले होते,

कारवाई बातमी : 79 लाखांचे चोर बीटी कपाशी बियाणे जप्त

या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी. ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रीमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रीमिलेयरची मर्यादा २० लाख रुपये करण्यात यावी. मंडल आयोग आणि स्वामिनाथ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या.

अवश्य वाचा : राज्यात वेळेपूर्वी दाखल होणार मान्सून

Rashtriya Obc Mahasangh ओबीसी प्रवर्गाचा अँट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा. इतर मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आणि राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या वर्षभरातील कार्यक्रम ठरविण्यासाठी ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. अध्यक्षीय भाषणात बोलताना मनाले की आपल्या अधिकारासाठी महाधिवेशनात सामील व्हा असे आवाहन केले.

 

 

बैठकीतचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी आज पर्यंत झालेल्या अधिवेशन बद्दल माहिती दिली.

बैठकीत सहसचिव शरद वानखेडे , राज्य कार्याध्यक्ष दिनेश चोखारे कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष शाम लेडे, ऍड पुरुषोत्तम सातपुते, विजय चहारे, प्रा अनिल शिंदे , माजी नगरसेवक प्रदिप देशमुख, वणीचे जिल्हाध्यक्ष विजय पिदूरकर, शाम राजूरकर , प्रा नितीन कुकडे, कवडू मांडवकर, प्रदिप पावडे,रामदास कामडी , प्रा बबनराव राजूरकर, अशोक सोनटक्के,दिनकरराव शिनगारे, अरुण चौधरी,कवडू लोहकरे तुळशीदास भुरसे, योगराज कावळे सुधाकर काकडे निखिल उपासे कालिदास येरगुडे मनोज बेले ,अक्षय येरगुडे ,अजय बलकी,मनीषा बोबडे, कुसुमताई उदार,ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे , प्रेमानंद जोगी, पांडुरंग गावतुरे ओबीसी महासंघ ,महिला महासंघ, युवा – युवती महासंघ, कर्मचारी महासंघ, किसान महासंघ, विद्यार्थी महासंघ , वकील महासंघ तसेच तालुका अध्यक्ष व सर्व कार्यकर्त् बैठकीला उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!