Removal of encroachment : मूल शहरातील अतिक्रमनावर चालणार प्रशासनाचा बुलडोझर

गुरू गुरनुले Removal of encroachment मुल – मुल शहरातील महत्वाचे मुख्य रस्ते अतिक्रमनाने बोकाळले आहे. ही चिंतेची बाब आहे. अतिक्रमणामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांनी ही बाब नगर पालिकेला कळविली. नागरिकांच्या मागणीला साथ देत नगर पालिका प्रशासनाने पोलिस प्रशासनाला विश्वासात घेत लवकरच अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट, प्रशासनाने दिला यलो अलर्ट चा इशारा

मुल शहरातील गांधीजींचा पुतळा असलेल्या मुख्य चौकापासून पूर्व पश्चिम,उत्तर दक्षिण चारही दिशेला अतिक्रम कित्येक दिवसांपासून बोकाळला आहे. शहरातील चार मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले. असल्याने चारही रस्ते पॅक झाले आहे. मुल- पूर्वेस हायवे गडचिरोली मार्ग, पश्चिमेस चंद्रपूर हायवे मार्ग, उत्तरेस सोमनाथ पर्यटन स्थळ रोड, तर दक्षिणेस जुना रेल्वेस्टेशन मुल- विश्राम गृह रोड, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.

अवश्य वाचा : 15 ऑगस्ट पूर्वी चंद्रपुरात सुरू होणार कॅन्सर हॉस्पिटल

Removal of encroachment पूर्वेस सर्वात जास्त गर्दी दारूच्या दुकानाजवळ व हार्डवेअर यांच्या दुकाना समोर नेहमीच ट्रक समान खाली करीत असते. लोखंडी सळाक,सिमेंट बॅग, व इतर साहित्य नेहमीच मुख्य मार्गावरच भर दिवसा ट्रक खाली करतांना दिसतात. पुढे बँक आफ इंडियाच्या समोरील भागात. तिथेच एक इलेक्ट्रिक दुकानाचे सामांन रस्त्यावरच असते. तिथेही नेहमीच गर्दी दिसून येते. त्याही पुढे मंगल कार्यालय, लग्नाची घाई गर्दी व पेट्रोल पंपाच्या समोर ते चामोर्सी नाक्यापर्यंत १० ते १५ खाली ट्रक नेहमीच रस्ता धरून उभे ठेवले जाते. येणाऱ्या मार्गावर गॅरेज,वेल्डिंग दुकान, यावेळी नेहमीच मुख्य वाहतुकीची कोंडी होत आहे.

महत्त्वाचे : घुग्गुस शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

Removal of encroachment याबाबत नगर प्रशासन,पोलिस प्रशासनाला जाणीव करुन दिली असताना देखील दाखल घेतल्या गेली नाही. तसेच पश्चिम चंद्रपूर मुख्य हायवे रस्ता हा बसस्टँड समोरील येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही गेट सकाळ रात्रीपर्यंत गजबज राहते. कारण खाजगी बस, त्याच ठिकाणी उभ्या ट्रॅव्हल्स,काळी पिवळी गाड्या, नास्त्याचे किरकोळ टपऱ्या, लागूनच असतात तिथेही रोजच वाहतुकीचा नियामच मोडून जात आहे तरी दुर्लक्ष केले जाते. पुढे तहसील कार्यालयासमोर वाहतूकोंडीच असते. उत्तरेस सोमनाथ रोडवर स्टेशनरी, कपड्याची, मुख्य बाजारपेठ, भांडे, चप्पल, रेडिमेड, इतर किरकोळ दुकान लावले असते , नगर परिषद,बँक, पोलिस स्टेशन, रोजची गुजरी, त्यामुळे गांधी चौक ते पोस्ट आफिस पर्यंत गाड्या पारकींगला जागा नसल्याने पाई जाणाऱ्यांना देखील आपला जीव मुठीत धरुन जावे लागत आहे.

 

या ही रस्त्यावर वाहतूक धारकांना तारेवरची कसरत करावी लागते. मधेच शासकीय कार्यालय आणि इतर आस्थापने याच मार्गावर असल्याने नागरिकांना आपल्या दैनंदिन कामासाठी यावे लागते. तसेच दक्षिणेस मेडिकल, झेरॉक्स, इेक्ट्रॉनिक्स दुकान,स्टेशनरी, दवाखाने, शाळेचे विद्यार्थी यांची नेहमीच रेलचेल असते. रोडला लागून असलेल्या अनेक दुकानदार आपला दुकानाचा गाळा सोडून बाहेर रस्त्यावर साहित्य ठेऊन विक्री करीत असतात. अशा प्रसंगी होणाऱ्या वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नाही.

अवश्य वाचा : चंद्रपुरातील वसुलीची यादी कुणाकडे?

Removal of encroachment या चारही मार्गावरील अतिक्रमण वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावे लागत आहे. वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने अनेकदा अपघात झाले असून जीवही गेले आहेत.दिवसेंदिवस वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. करीता शहरातील वाढते अतिक्रमण बाबत अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी, वृध्द नागरिकांनी, जागृत महिलांनी देखील प्रशासनाला वेळोवेळी अवगत केले आहे.

 

भविष्यात अतिक्रमणावर आळा घातल्या गेला नाही, काही उपाय योजना प्रशासनाने केल्या नाही तर मात्र मुलची जनता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही. अशीही चर्चा नगरात केली जात आहे.

 

Removal of encroachment यासाठी नगर पालिका व पोलिस प्रशासनाने याची दखल घेत स्मार्ट सिटी शहरातील अतिक्रमण लवकरच काढण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात येणार असून वाढलेले अतिक्रमण नक्कीच काढण्यात येईल असे समजले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!