Sewer Line cleaning : ती गटार लाईन कधी साफ होणार?

गुरू गुरनुले

Sewer Line cleaning मूल – यावर्षीचा पावसाळा तोंडावर आला आहे. यंदा मान्सून लवकरच बरसणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. हे लक्षात घेता मूल नगरपरिषद प्रशासन मान्सूनपूर्व तयारीला लागायला पाहिजे होते. कारण मागील वर्षी नगरात आलेली परिस्थिती पाहता यंदा मात्र शहरातून धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासोबत् धावणाऱ्या गटरलाईनची सफाई हा विषय तेवढाच महत्वाचा असून पावसाळ्यातील अडगळ थाबविणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

अवश्य वाचा : राज्यातील मुलींना मिळणार उच्चशिक्षण अगदी मोफत

Sewer Line cleaning गत अनेक वर्षांपासून सफाईसाठी तरसलेल्या मूल शहरातुन धावणाऱ्या चंद्रपूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाचे दोन्ही कडेला बांधण्यात आलेल्या या मोठया गटरलाईनला आजवर दुर्लक्षीत ठेवण्यात आले आहे. व याचा मोठा फटका अनेकदा निवासी घरांना बसला आहे. अनेक घरात पाणी घुसले काही कुटुंबीयांना तीन दिवस घराच्या बाहेर कुटुंब हलवावे लागले. मूल शहरातून महामार्गासोबत् धावणारी गटरलाईन अंदाजे एक चतुर्थांस माती व केरकचऱ्याने भरलेली आढळते.

 

या गटरलाईन मधून संपुर्ण शहरातील सांडपाण्याचा निचरा तलावांमध्ये होतो. पावसाळ्यातील शहराच्या चहूबाजूने येणाऱ्या पावसाच्या पाण्याला सामावून घेण्याचे महत्वाचे काम ही गटरलाईन करते. आधीच ही गटरलाईन पावसाचे पाणी वाहून नेण्यास तांत्रिकदृष्टया सक्षम नसल्याची ओरड आहे. अशा स्थितीत गटरलाईन तुडूंब भरून जोडलेल्या नाल्यांचे पाणी थोपून शहरातील मोठया परिसरात पसरण्याची भिती निर्माण होत असते.

महत्वाची माहिती : 12 वी चा निकाल लागला, आता कोणता अभ्यासक्रम निवडणार? 

Sewer Line cleaning गेल्या २०२०, व २०२१ मध्ये शहरातील शेकडो घरांमध्ये जमा झालेले पुराचे घाण पाणी घुसून सतत तीन दिवस पाणी जमा होऊन जिवघेणी परीस्थिती निर्माण झाली होती. अखेर शहराबाहेरून वन विकास महामंडळाचे क्षेत्रातून भरमसाठ अतिरीक्त पाणी अर्धा कि.मी. नाला काढून परस्पर बाहेर काढावे लागले होते. हे विसरता येणार नाही.

 

मूल शहरातून अंदाजे एक ते दिड कि.मी. लांबींची ही गटरलाईन असून यावर संपुर्ण अतिक़मण झाले आहे. यावर हाटेल्स,खानावळ,हार्डवेअर,फर्नीचर वर्क्स, पानठेले,बियरबार बसलेले असून दररोज मोठया प्रमाणात जमा झालेला केरकचरा या गटरलाईन मध्ये टाकला जातो. तसेच महामागांवरील बांधकामासाठी वापरण्यात येणारे रेती,माती,विटांचे तुकडे या गटरलाईन मध्येच साठवले जात आहे. अशा स्थितीत पावसाळ्यापूर्वी या गटरलाईनची सफाई मोहीम नगर परिषद प्रशासनाने तात्काळ राबविली नाही तर पावसाळ्यात पाणी चौफेर पसरून जिवघेणी स्थिती निर्माण होईल हे निश्चित असल्याची भिती व्यक्त होताना दिसते.

 

Sewer Line cleaning न.प. मूल चा आरोग्य व स्वच्छता विभाग मान्सूनपूर्व कामे नेटाने करीत असला तरी यंदा मात्रं या गटरलाईनची पूर्ण सफाई अगत्याने करावी लागणार आहे.
मूल न.प.प्रशासक व न.प. मुख्याधिकारी यांनी हा विषय गंभिरतेने घेतल्यास येणारा पावसाळा शहर वासियांना अडचणीत टाकणारा ठरणार नाही असे जाणकारांनी बोलून दाखविले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!