Superintendent of Excise : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात मोठा खुलासा होणार पण….

Superintendent of Excise 7 मे ला चंद्रपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऐतिहासिक कारवाई करीत उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्या नवीन बिअर शॉप च्या परवान्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

अवश्य वाचा : ताडोबा जंगलात असं काय घडलं की पर्यटकांवर ताडोबा प्रशासनाने केली कारवाई

Superintendent of Excise  मात्र आता ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधिक विभागाच्या जिव्हारी लागत असल्याची माहिती सुत्रांद्वारे पुढे आलेली आहे, तपास थांबवावा असे दबावतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर वापरण्यात येत आहे अशी खळबळजनक माहिती मिळाली आहे.

 

Superintendent of Excise  लाच प्रकरणात अधीक्षक संजय पाटील हे सद्या फरार असून ते पोलिसांच्या हाती लागले नाही, दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षक आधीच पोलिसांच्या अटकेत आहे, संजय पाटील यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडी मारल्या, त्यामध्ये त्यांना मोठं घबाड मिळाले, मात्र पाटील अटकेबाहेर असल्याने ते आपल्या धनशक्तीचा वापर करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

Superintendent of Excise  जर पाटील हे पोलिसांच्या हाती लागल्यास चंद्रपुरातील अनेक बडे अधिकारी यांचे नाव सुद्धा नियमबाह्य दारू दुकानाच्या परवान्याबाबत केलेल्या वसुली मध्ये हिस्सेदार म्हणून समोर येणार, ही चाहूल लागताच भ्रष्टाचारी अधिकारी आपल्या संपर्काचा वापर करीत पाटील यांना वाचविण्याचे प्रयत्न करीत आहे.

 

पाटील हे काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून ते चंद्रपुरात घडत असलेल्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहे, आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने कुणाकडून किती वसुली केली, व या वसुली मोहिमेत कोण कोण सहभागी आहे हे पाटील यांच्या अटकेनंतर पुढे येईल, मात्र अटकेपासून ते स्वतःचा बचाव करीत आहे.

 

Superintendent of Excise  विशेष म्हणजे पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी मोठी कारवाई करीत राज्यात खळबळ उडवून दिली आहे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या इतिहासात चंद्रपुरात आजपर्यंत कुणीही इतकी मोठी कारवाई केली नाही.

 

त्यांच्यावर सुद्धा पोलीस विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी दबाव टाकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, मात्र कर्तव्यापुढे काही नाही अशी भूमिका भोसले यांनी घेतली आहे.

 

उत्पादन शुल्क चंद्रपूर विभागाचे पीडित दारू व बार मालक आता या वसुली मोहिमेपासून दूर झाले आहे. पोलीस विभागाकडे इतकी सशक्त यंत्रणा असल्यावर सुद्धा संजय पाटील अजूनही त्यांच्या हाती का लागले नाही हा मोठा सवाल आहे? मोठे मंत्री असो की अधिकारी ते तात्काळ तपास यंत्रणेच्या हाती लागतात मग चंद्रपुरात असं का घडत नाही. याजागी कुणी सामान्य नागरिक असता तर तो कधीचाचं पोलिसांच्या हाती लागला असता.

 

10 मे ला अटकेत असलेल्या दोघांची पोलीस रिमांड संपत आहे जर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर तपास हा अर्धवट राहणार, जोपर्यंत संजय पाटील यांना अटक होणार नाही तो पर्यंत अटकेत असलेल्या आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढविण्यात यावी अशी चर्चा आता जनमानसात रंगली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!