Tadoba safari timing : ताडोब्यात असं काय घडलं? पर्यटकावर कारवाई

Tadoba safari timing चिमूर – ताडोबा व्याघ्र प्रकल्पात विना परवाना पर्यटन रस्त्याने अपप्रवेश करणे पर्यटकास महागात पडले असून वन विभागाने पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

 

Tadoba safari timing ताडोबातील व्याघ्र दर्शनासाठी देश विदेशातील पर्यटक ताडोबात येत असतात. विविध सेलिब्रिटींना सुद्धा ताडोबातील वाघ भुरळ पाडतात. व्याघ्र दर्शन करताना दिलेल्या नियमाचे पालन करूनच व्याघ्र दर्शन करावे लागतं. पण काही पर्यटक अतीउत्साहात नियमाची पायमल्ली करताना आढळून येतात.

हे ही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे थैमान

आज दिनांक 9 मे 2024 रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास नीमढेला गेट परिसरात एम एच 49. BK 2818 या क्रमांकाचे श्रीमती सविता ताकसांडे यांच्या मालकीचे चारचाकी वाहनाने विना परवाना पर्यटन रस्त्याने अपप्रवेश करताना सफारी पर्यटकांना आढळले असता सफारी गाईड यांनी वन विभागाला दूरध्वनी द्वारे माहिती दिली, वन परिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांचे मार्गदर्शनात रेंजर ऑफिसर मोहन हटवार वनरक्षक बोपचे STPF टीम यांनी श्रीमती सविता ताकसांडे यांचेवर पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!