Tadoba tiger fight : दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

Tadoba tiger fight बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा बल्हारशाह जंगल सफारी मध्ये दिनांक 13 मे 2024 ला बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी गस्त करीत असतांना सकाळी 9.30 वाजताचे सुमारास सफारी मधील कक्ष क्रं.510 नियतक्षेत्र किन्ही येथे दोन वाघाच्या झुंजीत एक अडीच वर्षीय नर वाघाचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले.

अवश्य वाचा – RTE प्रवेश प्रक्रिया या तारखेला सुरू होणार

Tadoba tiger fight पुढील कार्यवाही करण्याकरीता मौका स्थळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी श्री. मुकेश भांदककर व राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी श्री. बंडु धोत्रे यांना बोलावुन यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन वन्यप्राणी (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये प्राथमीक वनगुन्हा क्रमांक 08961/224013 दिनांक 13.05.2024 जारी करुन मृत वाघाचे शव ताब्यात घेण्यात आले व शव शवविच्छेदना करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले.

सीबीएसई निकाल – चंद्रपूर जिल्ह्यातील या मुलाने चंद्रपूर परीक्षेत पटकावला प्रथम क्रमांक

मृत बछडयाचे शवाचे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, TTC चंद्रपुर व डॉ. आनंद नेवारे, पशुवैद्यकीय अधिकारी, चंद्रपुर यांनी केले. सदर प्रकरणात पुढील तपासा करीता मृत वाघाचे सिलबंद नमुने घेण्यात आले असुन ते रासायनीक विश्लेषणाकरीता वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठविण्यात येणार आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत. सदर कार्यवाही पुर्ण करण्याकरीता क्षेत्र सहाय्यक श्री.व्हि.पी. रामटेके, श्री.बि.टी.पुरी, वनरक्षक कु.वैशाली जेणेकर, कु.माया पवार, श्री. रंजीत दुर्योधन, श्री. परमेश्वर आनकाडे, श्री.एस.एस. नैताम व श्री. मनोहर धाईत व रोजंदारी वनसंरक्षण मजुर यांनी सहकार्य केले.

 

Tadoba tiger fight चंद्रपूर जिल्ह्यात सतत वाघांचे मृत्यू होणे ही चिंतेची बाब असली तरी त्यांच्या अधिवासाला चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्र हे पुरेसे नसल्याने वाघांच्या झुंजी सतत होत आहे, वर्ष 2024 मध्ये हा वाघाचा 7 वा मृत्यू आहे.

 

याआधी 15 जानेवारी बोर्डा वनक्षेत्रात, 18 जानेवारीला भद्रावती येथे, 22 जानेवारी कोळसा जंगलात येथे 2 वाघांचा मृत्यू, सावली येथे 27 फेब्रुवारी, बल्लारपूर कळमना 8 मे, 13 मे रोजी बल्लारपुर कारवा जंगल क्षेत्रात वाघाच्या मृत्यूची घटना घडली आहे. या सर्व घटनेचे कारण वाघाची झुंज असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने लावला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!