Tiger Hunting Images : त्याने कुऱ्हाडीने केले वाघाचे तुकडे, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

गुरू गुरनुले

Tiger Hunting Images मुल – चंद्रपुर वनविभागा अतंर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील उपक्षेत्र मुल, नियतक्षेत्र चिरोली अतंर्गत मौजा चक नलेश्वर येथे दिनांक ०६/०५/२०२४ रोजी वनाधिकऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे मुल तालुक्यातील उथळपेठ येथील शेतकरी सुरेश विठ्ठल चिचघरे यांनी सर्व्हे क्रमांक 55/2 खाजगी शेत येथे शेतात लावुन ठेवलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाने वन्यप्राणी वाघाची शिकार करुन त्याचे मृत शव जाळुन जमिनीत दफन केल्याची गुप्त माहिती मिळाल्याने त्याची शहनिशा करुन वनाधिकाऱ्यांनी सुरेश विठ्ठल चिचघरे, रा. उथळपेठ यांनी सहे क्रमांक 55/2 खाजगी शेत मौजा चक नलेश्वर येथे जाऊन पाहणी केली असता सदर शेतात मक्का पिकाची पेरणी केलेली होती.

अवश्य वाचा – वेळेपूर्वी दाखल होणार मान्सून

Tiger Hunting Images सदर शेतातील पिकाच्या मधल्या भागामध्ये जमिनीवर जाळलेले ठिकाण दिसुन आले. त्याच जाळलेल्या ठिकाणी पावड्याच्या सहाय्याने खोदकाम करुन पाहणी केली असता त्यामध्ये वाघ या वन्यप्राण्याचे १ नग सुळे दात व जळालेले इतर अवयव आढळुन आल्याची खात्री पटल्याने. शेतकरी आरोपी सुरेश विठ्ठल चिचघरे यांना याबाबतची खरी माहिती विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, अंदाजे माहे डिसेंबर २०२३ मध्ये धानाचे पिक निघाल्यानंतर पाळीवर लावलेल्या सदर तुर पिकाच्या संरक्षणार्थ शेती लगत असलेल्या 11 KV जिवत विद्युत प्रवाह सोडुन ठेवले होते.

अवश्य वाचा : मोफत होणार इंग्रजी शाळेत प्रवेश, 17 मे पासून होणार सुरुवात

Tiger Hunting Images त्यामध्ये वन्यप्राणी वाघाचा स्पर्श होऊन वाघ विद्युत करंट लागून मृत पावले. त्यांनतर वन्यप्राणी वाघा स धानाचे तनसीमध्ये टाकुन ठेवले व त्याला तिन दिवस कुऱ्हाडीच्या सहाय्याने तुकडे करुन जाळण्यांत आले. व जळालेले संपुर्ण अवयव नष्ट करण्याचे हेतूने स्वतःचे मालकीच्या ट्रॅक्टरने नांगरनी करुन पुरावे नष्ट करण्यांचे कृत्य केल्याचे वनाधिकारी यांना लक्षात आले.

 

सदर घटना स्थळाची पाहणी करण्या करीता मा. सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) जी. आर. नायगमकर बंडू घोतरे, राष्ट्रीय व्याघ्र प्राधीकरण प्रतिनीधी, व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनीधी मुकेश भांदककर यांनी भेट दिली असता शेतकरी आरोपी सुरेश विठ्ठल चिचचरे याने केलेले कृत्य पुराव्यासह उघडकीस आल्याने आरोपी सुरेश विठ्ठल चीचघरे याला महाराष्ट्र वन्यजीव सरंक्षण अधिनियम 1972 नुसार जिवंत विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने अवैध वन्य प्राण्याची शिकार केल्याचे सिध्द झाल्याने त्या अनुषंगाने गुन्हा नोंद करून सुरेश विठ्ठल चिचघरे, रा. उथळपेठ यांना अटक करुन त्याला मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी न्यायालय, मूल येथे हजर केले असता आरोपीस १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजुर करण्यांत आली.

 

Tiger Hunting Images सदर प्रकरणात आरोपी सुरेश विठ्ठल चिचघरे, याला वन्यप्राणी वाघ जाळण्यास व त्याचे हाडे जमिनीत पुरविणे करीता मदत केलेला सहआरोपी श्रीकांत मुरलीधर बुरांडे, रा. उथळपेठ याला दिनांक 08.05.2024 रोजी अटक करुन मा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी न्यायालय, मूल येथे हजर करण्यांत आले. सदर प्रकरणातील आरोपी सुरेश विठ्ठल चीचघरे, याने वाघाच्या शीकारीचे पुरावे नष्ट करण्याकरीता वापरण्यांत आलेले मेसी कंपनीचे ट्रॅक्टर नांगरटीसह व मोटार सायकल जप्त करण्यांत आले.

 

याबाबतची कार्यवाही चंद्रपुर वनविभागाचे विभागीय वन अधीकारी, शुभांगी चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु) जी. आर. नायगमकर, यांचे मार्गदर्शनाखाली चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधीकारी,(प्रादेशिक) प्रियंका आर. वेलमे, संजीवनी पर्यावरण संस्थेचे प्रमुख वन्यप्राणी प्रेमी उमेशसिंह झीरे, एम.जे. मस्के, क्षेत्र सहाय्यक मुल, पि.डी. खनके, क्षेत्र सहाय्यक महादवाडी, एन.डब्ल्यु. पडवे, क्षेत्र सहाय्यक केळझर, एस.जी. गेडाम, वनरक्षक चिरोली, राकेश गुरनुले, वनरक्षक जानाळा, सुधीर ठाकुर, वनरक्षक मूल, तन्मयसिंग झिरे यांचेसह इतर वनकर्मचारी उपस्थीत होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!