Today Acb Trap News 7 मे ला चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना 1 लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
अवश्य वाचा : मित्रांचे टोळके तलावात पोहायला गेले, दोघे जण बुडताच इतर मित्र पळाले, धक्कादायक घटना
Today Acb Trap News फिर्यादी हे घुग्गुस येथील रहिवासी असून त्यांचं घुग्गुस येथे गोदावरी बार अँड रेस्टारेंट आहे, फिर्यादी यांनी वर्ष 2023 नोव्हेंबर मध्ये नवीन बिअर शोपीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता, मात्र त्यावेळी त्यांना अधीक्षक संजय पाटील व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी फिर्यादीला आज या उद्या या म्हणत त्यांना नाहक त्रास देत टाळाटाळ केली.
Today Acb Trap News काही दिवसांनी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी मी तुमचा बिअर शोपीचा परवाना मंजूर करून देतो मात्र त्यासाठी अधीक्षक व स्वतःसाठी 1 लाख रुपयांची मागणी केली.
फिर्यादी यांची पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी 25 एप्रिलला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली.
Today Acb Trap News मध्यंतरी फिर्यादी यांना 1 लाख रुपयांची लाच मागितली, 7 मे रोजी उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर कार्यालयात कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी खारोडे यांच्या सांगण्यावरून 1 लाख रुपयांची रक्कम स्वीकारली, त्यानंतर चेतन खारोडे यांनी पैसे मिळल्याबाबत अधीक्षक पाटील यांना मोबाईल द्वारे सूचना दिली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री पटवित, 1 लाख रुपये स्वीकारताना अभय खताळ यांना रंगेहात अटक केली.
सदर लाच प्रकरणी अधीक्षक संजय पाटील, अभय खताळ व चेतन खारोडे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Today Acb Trap News सदरचा यशस्वी सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी नरेश नन्नावरे, हिवराज नेवारे, संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे व सतीश सिडाम यांनी केला.
वर्ष 2015 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती, 6 वर्षानंतर म्हणजेच 2021 ला महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्याची दारूबंदी हटविली.
Today Acb Trap News दारूबंदी हटल्यानंतर चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाने नियमबाह्य दारू दुकानासाठी परवाने दिले, विभागाचे अधीक्षक संजय पाटील हे रुजू झाल्यावर सुद्धा हीच परिस्थिती कायम राहली. ज्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली त्यावेळी एकूण 350 बिअर बार होते, वर्ष 2021 मध्ये दारूबंदी उठविल्यावर जिल्ह्यात तब्बल 750 बिअर बार अस्तित्वात आले, अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात 400 नव्या बिअर बार ला परवाने देण्यात आले.
अधीक्षक संजय पाटील यांच्या संपत्तीची SIT मार्फत चौकशी करा – मनोज पाल भाजप नेते
उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक संजय पाटील यांनी नियमबाह्य पध्दतीने बिअर बार चे परवाने वाटप केले, आणि एका परवान्यामागे लाखो रुपये यांनी मागितले होते, याबाबत संपूर्ण माहिती आम्ही काढलेली आहे, याबाबत आम्ही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चौकशी करण्यासंबंधीचे निवेदन दिले आहे, लवकरच कारवाई होणार अशी अपेक्षा आहे, संजय पाटील विरोधात आम्ही लवकरच पत्रकार परिषदेमार्फत खुलासा करणार आहो.