Chandrapur Warora naka accident चंद्रपूर शहरातील खुनी पुलिया म्हणून ओळखल्या वरोरा नाका चौकातील उड्डाणपूलावर अपघाताची मालिका सुरूच आहे.
अवश्य वाचा : चंद्रपुरातील 2 दिवस उष्णतेचे, उष्णतेची यलो अलर्ट
Chandrapur Warora naka accident महिन्याभरात या पुल परीसरात तब्बल 4 ते 5 अपघात झाले आहे, आज 28 मे ला रात्री 8.30 वाजता गिट्टी भरलेला मालवाहू ट्रक पुलावरून मूल मार्गाकडे जात असताना पलटी झाला, यामुळे नागपूर वरून चंद्रपूर च्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Chandrapur Warora naka accident वरोरा नाका उड्डाणपूल हा वादग्रस्त पूल म्हणून ओळखला जातो या पुलावर तब्बल 51 नागरिकांनी अपघातात आपला जीव गमावला आहे, पुलिया दुरुस्ती झाल्यावर आता वाहन पलटण्याचे प्रमाण आता वाढत आहे, याच महिन्यात वाहन पलटण्याची ही चौथी घटना आहे.
अत्यंत महत्त्वाचे : अपघाताच्या पार्श्वभूमीवर वरोरा नाका चौकात होणार हे बदल
या पुलपरीसरात सिग्नल लावण्यात आले मात्र ते अजूनही उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे, अपघाताची मालिका वाढल्यावर प्रशासनाला जाग आली मात्र अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.