Water tanker service : भाजपच्या किल्ल्यात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची मदत

Water tanker service पोंभूर्णा: चेकठाणा येथील पाण्याची पातळी आटल्याने विहीर,हातपंप व नळाद्वारे होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला, त्यामुळे गावातील लहानग्यांपासून ते वयोवृद्धांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. या गावाला भीषण टंचाईला समोर जावे लागत आहे. याबाबत गावातील शिवसेना कार्यकर्ते यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना माहिती देताच या तहानलेल्या चेकठाणा वासीयांसाठी पाणीपुरवठा करण्याचा शब्द देत तत्काळ स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. विशेष बाब म्हणजे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोम्भूर्णा तालुक्यातील चेकठाणा गावात पाणी टंचाई ची परिस्थिती उदभवली आहे.

 

Water tanker service चेकठाणा गावापासून चार – पाच किमी अंतरावर वैनगंगा नंदी आहे,त्या नदिवरून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो परंतु नदी कोरडी पडली आहे. या नदी वर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजना बंद पडली व गावात असणारे विहिरी, हातपंप ला पाणी येत नाही त्यामुळे गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. असे असताना सुद्धा ग्रामपंचायतने कुठली उपयोजना केले नाही.गावात ग्रामसेवकांच्या दर्शन दुर्लभ असून ग्रामसेवक मुल ला असतो त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

अवश्य वाचा : शहरातील वरोरा नाका चौकात बदलाचे वारे

Water tanker service गावातील पाणी टंचाईची समस्या गावातील शिवसैनिक जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना सांगताच उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गिऱ्हे हे टंचाईग्रस्त गावाच्या मदतीला धावून आले आहेत. स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे.या उपक्रमाचा गावासह परिसरात कौतुक केल्या जात आहे.

अवश्य वाचा : चंद्रपुरातून पंतप्रधान मोदी यांना पत्र

यावेळी संदीप गिर्हे यांनी ज्या गावात पाणी टंचाई आहे त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांशी सम्पर्क साधावा त्याठिकाणी निशुल्क पाण्याचा टँकर पोहचविल्या जाणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!