Who killed Hemant Karkare? : शहीद हेमंत करकरे यांचा वडेट्टीवार यांनी केला अपमान – राहुल पावडे

Who killed Hemant Karkare? २६/११ ला मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना त्या हल्ल्यात लागलेली गोळी अतिरेक्यांची नसून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित पोलीस खात्यातील एका अधिकाऱ्याची आहे असे चुकीचे विधान करणारे राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुरातील जटपूरा गेट येथे भाजपा तर्फे निषेध करण्यात आला.

अवश्य वाचा : आईस्क्रीम खायला गेला आणि ट्रक खाली चिरडला

Who killed Hemant Karkare? २६/११ च्या भ्याड हल्ल्यात हेमंत करकरे असतील किंवा सम्बंधित इतर पोलीस अधिकारी असतील यांनी आपल्या प्राणाची आहुती देत नागरिकांना त्या ठिकाणाहून सुखरूप बाहेर काढण्याचे काम केलं. मात्र विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी असे विधान करून त्यांचा अपमान केला आहे.

 

शहीद झालेल्या अश्या अधिकाऱ्यांच्या वीरमरणाविषयी पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर शंका निर्माण करत चुकीचं आक्षेपार्ह विधान राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे करीत आहे.

 

Who killed Hemant Karkare? निश्चितपणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे इतके वर्ष लोटल्यानंतर अश्या पद्धतीचे विधान करणे योग्य नाही म्हणून आज भारतीय जनता पार्टीतर्फे विजय वडेट्टीवारांचा निषेध करण्यात आला. असे आक्षेपार्ह विधान करून अगदी निवडणुकीच्या तोंडावर जनतेत संभ्रम निर्माण करणे हेच वडेट्टीवारांचा आणि महविकास आघाडीचे हे कार्य आहे त्याचा भाजपतर्फे शहर अध्यक्ष राहुल पावडे यांनी निषेध केला आहे.

 

वडेट्टीवार यांच्या विधानाचे समर्थन

विरोधीपक्ष विजय वडेट्टीवार यांच्या या विधानावर who killed karkare या पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी मुश्रीफ यांनी समर्थन केले आहे, वडेट्टीवार यांनी जे विधान केलं ते सर्व खरं आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!