Zilla Parishad High School : शिक्षकाची कायमस्वरूपी नियुक्ती करा – सचिन राजूरकर

Zilla Parishad High School चंद्रपूर जिल्ह्यातील चकनिंबाळा गावातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी ग्रामस्थ आणि पदाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून कायम शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

अवश्य वाचा : काय म्हणता ! चंद्रपुरात 79 लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त

Zilla Parishad High School चकनिंबाळा हायस्कूलमध्ये दोन शिक्षक निलंबित झाल्यामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण बिघडले आहे. यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत टाकण्याचा विचार करत आहेत. शाळा बंद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होईल.

अवश्य वाचा : यादिवशी होणार मान्सून चे आगमन

Zilla Parishad High School सध्या तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेले शिक्षक प्रमोद बाभळीकर हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत आणि त्यांना कायम शिक्षक बनवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शाळेसाठी तीन अतिरिक्त शिक्षकांचीही आवश्यकता आहे.
गावकऱ्यांनी आणि पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती केली आहे.

 

शाळेसाठी तीन अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती केली जावी, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद शिक्षण विभागालाही 17 मे रोजी देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, चेकनिंबाला गावातील,अंकुश कौरासे,अशोक बोबडे ,मारोती देवतळे,संजय ऊरकुडे,राम जुनघरे,सचिन आस्वले उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!