Adhar ration card link : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

Adhar ration card link आपल्याकडे रेशन कार्ड असेल आणि आपण सरकारकडून मिळणाऱ्या मोफत अथवा स्वस्त रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे.

अवश्य वाचा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आत्मदहन

Adhar ration card link सरकारने आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख आणखी पुढे ढकलली आहे. यावेळी सरकारने तीन महिन्यांनी मुदत वाढवली आहे. यापूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२४ होती. ती आता ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केली आहे.

अवश्य वाचा : चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटाने जाळला ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा

आधार आणि रेशनकार्ड लिंक करणे का आहे आवश्यक?

सरकारने ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ची घोषणा केल्यापासून रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.

 

Adhar ration card link एकापेक्षा अधिक रेशनकार्ड असलेले लोक वेगवेगळ्या ठिकाणांवरून मोफत रेशनचा लाभ घेत असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे.

 याला आळा घालण्यासाठी रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय, अनेक लोक मृत व्यक्तींच्या रेशन कार्डवरही लाभ घेत आहेत. यामुळे गरजू लोकांचे नुकसान होते. असे, सर्व प्रकार थांबवण्यासाठी सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.

 

यापूर्वीही अनेकवेळा देण्यात आलीय मुदतवाढ

 आधार आणि रेशन कार्ड लिंक करून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

 महत्वाचे म्हणजे, रेशन कार्ड आधारला लिंक करण्याच्या अंतिम तारखेला सरकारने यापूर्वीही अनेक वेळा मुदत वाढ दिली आहे. आता पुन्हा एकदा हिला मुदतवाढ देत ३० सप्टेंबर २०२४ करण्यात आली आहे. आधार आणि रेशन कार्ड लिंक झाल्यानंतर, गरजूंपर्यंत त्यांच्या वाट्याचे खाद्यान्न पोहोचणे सोपे होईल. ते सुरळितपणे पोहोचू शकेल.

 

शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर नागरिकांनी लवकरात लवकर आधार आणि रेशन कार्ड लिंक करून घ्यावे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!