after 12th computer science courses : हा अभ्यासक्रम निवडा आणि मिळवा लाखोंचे पॅकेज

after 12th computer science courses 12 वी नंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आपण नेमका पुढे कोणता अभ्यासक्रम निवडावा, आज आपल्याला भरगच्च पगार असणारे अभ्यासक्रम असणारे कम्प्युटर सायन्स बाबत सांगणार आहोत.

अवश्य वाचा : 15 जूनपासून राज्यात 1 राज्य 1 गणवेश योजना लागू होणार

बॅचलर ऑफ इंजीनियरिंग इन कम्प्युटर सायन्स:

यामध्ये बीई हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सिस्टम शिकवली जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर, नेटवर्क इंजिनिअर किंवा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर अशा पदांवर हा कोर्स केलेल्या उमेदवाराला नोकरी मिळते व सुरुवातीलाच अगदी वार्षिक चार ते आठ लाख रुपयांची पॅकेज मिळू शकते. या अभ्यासक्रमामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, आयटी आणि कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतात.

अवश्य वाचा : जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार हे कागदपत्रे

बीएससी इन कम्प्युटर सायन्स:

बीएससी इन कॉम्प्युटर सायन्सच्या माध्यमातून पदवीधरांना सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअर डेटा अनालिस्ट म्हणून म्हणून काम करणाऱ्या वेब डेव्हलपर्स वर्षाला तीन ते सहा लाख रुपयांचे पॅकेज कमवतात. हा कोर्स केल्यानंतर आयटी आणि संशोधन क्षेत्रामध्ये मोठी संधी उपलब्ध होते.

 

बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी:

after 12th computer science courses आयटीच्या माध्यमातून सॉफ्टवेअर विकास तसेच संगणक प्रणाली आणि नेटवर्क प्रशासन यांचा समावेश आहे. या माध्यमातून नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर किंवा सायबर सिक्युरिटी अनालिस्ट म्हणून यामध्ये पदवीधरांना वार्षिक 4 ते 9 लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच फायनान्स आणि सरकारी क्षेत्रामध्ये हा कोर्स पूर्ण केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.

 

बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन म्हणजेच बीसीए:

या अभ्यासक्रमामध्ये कंप्यूटर एप्लीकेशन आणि प्रोग्रामिंग भाषांवर जोर देण्यात येतो. सॉफ्टवेअर टेस्टिंग तसेच डेव्हलपमेंट किंवा सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन सारख्या पदांवर या कोर्समध्ये पदवीधर असलेल्या पदवीधरांना वार्षिक अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आयटी कंपन्या तसेच सरकारी संस्था आणि ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

महत्त्वाचे : या पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या मदतीला आली दामिनी

बीएससी इन डेटासायन्स:

बीएससी डेटा सायन्स अभ्यासक्रमामध्ये डेटा विश्लेषण, एमएल आणि सांख्यिकीय मॉडेलिंग वर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाते. डेटा अनालिस्ट, सायंटिस्ट किंवा बीआय ऍनालिस्ट म्हणून पदवीधरांना वर्षाला पाच ते दहा लाख रुपये पर्यंत पॅकेज मिळते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनालिटिक्स आणि एआय उद्योगांमध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहे.

 

बीएससी सॉफ्टवेअर:

हा अभ्यासक्रम अभियांत्रिकी पद्धती तसेच कोडींग आणि प्रकल्प व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतो. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपर्स किंवा टेस्टर म्हणून पदवीधरांना एका वर्षाला साडेतीन ते सात लाख रुपये पर्यंत पॅकेज मिळते.

 

बीएससी इन सायबर सिक्युरिटी:

after 12th computer science courses या अभ्यासक्रमामध्ये येथे एथीकल हॅकिंग आणि मॅनेजमेंट व नेटवर्क सेक्युरिटी इत्यादी विषयावर लक्ष केंद्रित केले जाते. सायबर सुरक्षा तज्ञ, अधिकारी किंवा प्रवेश परीक्षक म्हणून पदवीधरांना एका वर्षाला चार ते आठ लाख रुपयांचे पॅकेज मिळते. सायबर सिक्युरिटी कंपन्या तसेच सरकार आणि फायनान्समध्ये या क्षेत्रातील उमेदवारांना चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!