Amrit Water Supply Scheme : चंद्रपुरातील नागरिकांना अमृत कधी मिळणार? – शिरीजकुमार गोगुलवार

Amrit Water Supply Scheme कोट्यवधी रुपये खर्च करून महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपूर शहरात अमृत जल योजना सुरू केली. योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पाण्याची पाईप लाईन टाकण्याची व्यवस्था करण्यात आली. तरीसुद्धा शहराच्या अनेक भागात अमृत जल योजनेची पाईप लाईन पोहोचलीच नाही. आणि ज्या भागात पाईप लाईन पोहोचली त्या भागात कनेक्शन सुरू करण्यात आले नाही.

Free school uniform scheme : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

विशेषता: चंद्रपूर शहराच्या महाकाली कॉलरी ,बाबुपेठ व पठाणपूरा या प्रभागात अजूनही अमृत जल योजनेचे कनेक्शन् सुरू केले नाही. या प्रभागातील लोकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावं लागत आहे. इतर कोणतेही पर्याय पाण्यासाठी या प्रभागात उपलब्ध नसल्यामुळे  बहुजन समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार यांच्या नेतृत्वात तिन्ही प्रभागाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित राहत चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांना अमृतजल योजनेचे कनेक्शन महाकाली कॉलरी, बाबुपेठ व पठानपुरा या भागात लवकरात लवकर सुरू करण्याबबत चर्चा करण्यात आली , सकारात्मक चर्चे नंतर या समस्येसंबंधीचे निवेदन आयुक्त यांना देण्यात आले.

अवश्य वाचा : चंद्रपूर शहराला पुरा पासून वाचवायचे असेल तर 20 फूट उंच भिंतिचे निर्माणकार्य करावे लागेल

Amrit Water Supply Scheme यावेळी बहुजन समाज पक्षाचे चंद्रपूर शहराचे अध्यक्ष अमोल राहुलगडे, घुगुस शहराचे अध्यक्ष सिद्धांत कोंडागुर्ला, प्रशांत रामटेके, अखिल निमगडे इतर बसपा कार्यकर्ता व महाकाली कॉलरी, पठानपूरा व बाबुपेठ परिसरातील महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!