anti venom medicine for snake bites चंद्रपुरात सर्पदंशाच्या घटनेत वाढ होत असून यावर आरोग्य विभागाने तात्काळ अँटी वेनम ड्रग्स खासगी व शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून द्यावे या मागणीचे निवेदन शरद पवार विचार मंचाने जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले.
अवश्य वाचा : या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरला
चंद्रपूर जिल्ह्यात नुकताच दोन सर्पदंशच्या घटना घडल्या असून सदर घटनेत एक दहा वर्षे मुलाचा आणि एक बारा वर्ष मुलीचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाला. सर्पदंश नंतर प्राथमिक उपचार करिता रुग्णाला नेले असता रुग्णालयात अँटी वेनम ड्रग्स उपलब्ध नसल्याने डॉक्टर
रुग्णावर उपचार करू शकले नाही. डॉक्टरांनी रुग्णाला सरकारी हॉस्पिटल मध्ये घेवून जा असे सांगितले.
सदर रुग्णाला हॉस्पिटलला नेत असतांना, दुर्दैवाने रस्त्यात तिचा मृत्यू झाला. तर मुलाचा मृत्यू हॉस्पिटल मध्ये झाला. जर हॉस्पिटलमध्ये अँटी वेनम ड्रग्स उपलब्ध असते तर सदर मुलीवर योग्य उपचार होवून तिचे प्राण वाचू शकले असते.
anti venom medicine for snake bites त्यामुळे आपणास निवेदन आहे की पावसाळ्यात सर्पदंश घटनेचे प्रमाणे अधिक असल्याने आपण चंद्रपूर जिल्ह्यात सर्पदंश रुग्णांना जवळच्या प्रायव्हेट / सरकारी हॉस्पिटल मध्ये अँटी वेनम ड्रग्सचा साठा तातडीने उपलब्ध करून द्यावा जेणेकरून डॉक्टरांना सर्पदंश रुग्णांवर योग्य उपचार करता येवून जीवितहानी टाळता येईल. निवेदन देताना शरद पवार विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, दिलीप रिंगणे आदि उपस्थित होते.