Babupeth police station मागील पाच वर्षांपूर्वी बाबुपेठ येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारण्यात आले त्यावेळी बाबूपेठ वासीयांतर्फे फार मोठे आंदोलन उभारले,त्यावेळी हत्याराला शिक्षा झाली आणि तेव्हाच बाबूपेठ येथे पोलीस चौकी मंजूर करण्याची मागणी बाबूपेठ वासीयांनी केली आणि ती प्रशासनाने मान्य करून बाबूपेठ येथे पोलीस चौकी मंजूर केली.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील या गावात बालविवाहचे प्रमाण जास्त
ती पोलीस चौकी काही दिवस सुरू होती परंतु बऱ्याच दिवसापासून बाबूपेठ पोलीस चौकी बंद अवस्थेत असल्याचे अनेकांनी सांगितले, पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्यामुळे ही पोलीस चौकी बंद राहत असल्यामुळे बाबुपेठ मध्ये काही अनपेक्षित घटना घडल्या किंवा छोटे मोठे भांडण तंटे ,चोरी झाली तर रात्री बेरात्री बाबूपेठ येथील नागरिकांना शहर पोलीस स्टेशन किंवा बागला पोलीस चौकीमध्ये पायपीट करून जावे लागते अशावेळी नागरिकांना प्रचंड मनस्ताप होतो.
अवश्य वाचा : कोण आहे कुलविंदर कौर?
Babupeth police station त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महिला काँग्रेस कडे निवेदनाद्वारे बाबूपेठ येथील पोलीस चौकी नियमित सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली,त्यांच्या मागणीची दाखल घेत दखल चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मा.मुक्कका सुदर्शन साहेब त्यांची भेट घेऊन बाबूपेठ पोलीस चौकी बाबत सविस्तर चर्चा करून बाबूपेठ पोलीस चौकी 24 तास सुरू ठेवण्याची निवेदनाद्वारे मागणी केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी निवेदनाची दखल घेत बाबूपेठ पोलीस चौकी यापुढे नियमित सुरू राहील असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले,निवेदन देताना चंद्रपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे,परिसरातील रोशनी राजूरकर,योगिता नवले,उपस्थित होत्या.