Babupeth railway over bridge चंद्रपूर : बहुप्रतिक्षित बाबूपेठ येथील रखडलेल्या रेल्वे ओवर ब्रिजच्या कामाची पाहणी करण्याकरिता आलेल्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजूभाऊ कुडे यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी तर्फे बाबुपेठ मधिल विविध समस्याचे निवारण करण्याकरिता निवेदन दिले.
ज्यामध्ये मुख्यता :- परिसरातील ऐतिहासिक असणाऱ्या पुरातन विहिरीला सुरक्षा जाळी बसवणे.
बाबूपेठ मधून बल्लारशाकडे जाणाऱ्या विद्युत वाहक ताराना अंडर ग्राउंड करणे. सिद्धार्थ नगर या ठिकाणी मनपाची जीर्ण अवस्थेत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा इमारतीचे नवीन बांधकाम काम करणे.
Babupeth railway over bridge कासव गतीने सुरु असलेल्या बाबुपेठ ब्रिज चा कामासंदर्भात ठेकेदारावर कामात विलंब करण्याबाबत कायदेशीर कारवाई करणे.
अवश्य वाचा : एकाच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 4 लाचखोरांना केली अटक
इत्यादी मागण्याना घेऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, संघटन मंत्री मनीष राऊत, जिल्हा सचिव आदित्य नंदनवार, प्रशांत रामटेके, सुशांत धकाते, अक्षय गोवर्धन, हरिदासजी पिंगे, दुर्गे भाऊ इत्यादी उपस्थित होते.