Ballarpur vidhansabha : बल्लारपूर विधानसभेत माळी समाजाचा उमेदवार हवा

Ballarpur vidhansabha मुल – राज्यात मराठा आणि ओबीसींमध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरून वाद पेटलेला आहे. त्यावरुन विधानसभेच्या निवडणुकीत पक्षांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यातच आता माळी समाजाने राज्यातील ४३ विधानसभा मतदार संघांवर दावा केला. याठिकाणी जो राजकीय पक्ष संधी देईल, त्याच पक्षाला माळी समाज साथ देईल. अशा स्वरूपातील उभे राहण्याचा ठराव रविवारी भुसावळ येथे माळी समाज हक्क परिषदेत करण्यात आला. तसेच मराठा समाजाला ओबीसी मधून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण द्यावे व 54 लाख कुणबी मराठा नोंदी रद्द कराव्या असा ठराव घेण्यात आला.

अवश्य वाचा : अमरावती येथील युवकांचा चंद्रपुरात मृत्यू

Ballarpur vidhansabha हक्क परिषदेत कण्यात आलेल्या मागण्या. १) विधान परिषदेवर माळी समाजाला प्रतिनित्त्व द्यावे. २) राज्यातील ४३ मतदार संघात समाजाचे प्राबल्य आहे. तेथे समाजाला विधान सभेदाठी प्राधान्य मिळावे. जो पक्ष उमेदवारी देईल, त्या पक्षाला माळी समाज साथ देईल व खंभिरपने पाठिशी उभे राहील.

३) ज्या ठिकाणी समाजाचा सक्षम उमेदवार आहे, पण त्याला कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष म्हणून समाजाने पाठबळ द्यावे. असेही ठरविण्यात आले. अशी मागणी पुढे आली. भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयाजवळील माळी भवनात रविवारी ‘ दिनांक २३ जून २४ रोजी माळी समाज हक्क परिषद’ आयोजित केली होती.

Ballarpur vidhansabha या परिषदेला राज्यभरातून १९२ प्रतिनिधींसह वेगवेगळ्या पक्ष, संघटनांमध्ये कार्यरत माळी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, माजी आमदार कृष्णराव इंगळे प्रदेश अध्यक्ष अरुण तीखे, माजी जी.प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले, सचिव नाना साहेब कांडलकर, व राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. पहिल्या सत्रात आलेल्या सर्वांचा परिचय घेण्यात आला. सह भोजन नंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली.

 

अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव इंगळे होते. याप्रसंगी राजकीय विषयावर जिल्हानिहाय मंथन मनोगत घेण्यात आले. पूर्वी समाजाचे १८ आमदार राहायचे परंतु आता ही संख्या कमी झाली यावर चर्चा करण्यात आली. आता येणाऱ्या विधान सभेत माळी समाजाचे संघटन मजबूत करुन तिकिटासाठी संघर्ष करण्याचे ठरविण्यात आले.

MP Pratibha Dhanorkar : संविधानाचा जयघोष प्रतिभा धानोरकर यांनी घेतली खासदारकी ची शपथ

माळी समाजाचे प्राबल्य असलेले मतदार संघ गोंदिया, साकोली, नागपूर (दक्षिण), बल्लारपूर, काटोल,मोर्शी, अचलपूर,तिवसा, आकोट, बाळापूर ,जळगाव जामोद, मलकापूर, धरणगाव, एरंडोल, मालेगाव,सठणा, नांदगाव,नाशिक,(मध्य), विंचूर,नगर,(दक्षिण), मिरजगाव, कर्जत ,जुन्नर, हडसपर, शिकापुर, पालघर, कन्नड, फुळंबी, परतूर, घनसांगवी, कळंबनुरी, कारंजा,वाशिम, मंग्रुळपिर, आष्टी,धाराशिव, मंगोला ,माढा, अक्कलकोट, जिंतूर वाई, या मतदार संघात माळी समाज प्रतिनिधित्व करेल असे ठरविण्यात आले.

 

Ballarpur vidhansabha माळी समाज हक्क परिषदेचे यशस्वी आयोजन मुख्य संयोजक कैलास महाजन, गजेंद्र महाजन, व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. माळी हक्क परिषदेला चंद्रपूर जिल्ह्यातून माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अरुण तीखे, माळी महासंघाच्या महिला आघाडीच्या प्रमुख संध्याताई गुरनुले, चंद्रपूर महानगर पालिका माजी नगर सेविका वंदना तीखे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव तथा मुल तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरुभाऊ गुरनूले, समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी प्राचार्य, बंडूभाऊ गुरनुले, माळी महासंघाचे विभागीय पदाधिकारी व ओबीसी कांग्रेस सेलचे राज्यस्तरीय सरचिटणीस, गुरुदास चौधरी उपस्थित होते. प्रत्येक जिल्हा निहाय हक्क परिषदेचे आयोजन करण्याच्या सूचना आलेल्या माळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. माळी हक्क परिषदेला २५० च्या वर राज्यातून पदाधिकारी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!