Bamni Protein Industries बल्लारपूर येथील बामणी प्रोटिन्स लिमिटेड हा उद्योग कंपनी व्यवस्थापन यांच्या चुकीच्या निर्णयामुळे बंद पडल्याने तब्बल 250 कामगारानावर उपासमारीची वेळ आली आहे. याविरोधात भारतीय केमिकल वर्क्स युनियन ने 20 मे पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले, आज 23 दिवसांनी कामगारांच्या या धरणे आंदोलनात कुटुंब सहभागी झाले, कंपनी व्यवस्थापनाने आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कामगारांच्या कुटुंबीयाने केली आहे.
अवश्य वाचा : आप ने केले स्मार्ट वीज प्रीपेड मीटर विरोधात निषेध आंदोलन
बल्लारपूर येथील बामणी मध्ये वर्ष 1998 पासून बामणी प्रोटिन्स हा उद्योग सुरु झाला होता, या कंपनीत तब्बल 250 कामगार कार्यरत आहे, वर्ष 2024 मध्य तथाकथित पर्यावरण वादी राजेश बेले यांनी बामणी प्रोटिन्स उद्योग हा मोठ्या प्रमाणात प्रदूषण करीत असल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली होती.
बेले यांच्या तक्रारीवरून प्रदूषण नियामक मंडळाने लॉकआऊट कारवाई करीत रीतसर प्रदूषण बाबतीत उपाययोजना करीत उद्योग पूर्वरत सुरु करा असे निर्देश 13 मार्च ला कंपनी व्यवस्थापनाला दिले.
अवश्य वाचा : चंद्रपुरातील कामगारांनी पंतप्रधान मोदी यांना लिहले रक्ताने पत्र
Bamni Protein Industries मात्र कंपनीने प्रदूषण नियामक मंडळाच्या निर्देशाचे पालन केले नाही, व नफ्यात असलेला उद्योग त्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला, विशेष म्हणजे कंपनीने कामगार संघटनांना कसलीही पूर्वसूचना न देता 19 मे 2024 ला कंपनीच्या गेटला टाळे लावले.
उद्योगात मान्यता प्राप्त कामगार संघटना असताना सुद्धा व्यवस्थापनाने कसलीही चर्चा केली नाही, त्यामुळे 20 मे पासून कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले.
यादरम्यान मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्यवस्थापनाशी बैठक घेतली मात्र व्यवस्थापनाही भूमिका उद्योग सुरु कारण्याबाबत सकारात्मक दिसून आली नाही.
Bamni Protein Industries त्यामुळे 12 जूनपासून कामगार सोबत त्यांचे कुटुंब महिला व मुले या लढ्यात सामील झाले, कामगारांच्या कुटुंबाला आता मुलांच्या भविष्याची चिंता होऊ लागली आहे. व्यवस्थापनाने जुलै महिन्यापर्यंत कामगाराना वेतन देण्याचं ठविले मात्र त्यांनतर काय होणार? हा प्रश्न कामगारांच्या पुढे आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभेतील हा महत्वाचा उद्योग होता जो बंद पडला.
महत्त्वाचे : 15 जूनपासून महाराष्ट्रात 1 राज्य 1 गणवेश
जर या आंदोलनानंतर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या काळात साखळी व आमरण उपोषणाचा एकमेव पर्याय आमच्याकडे असणार असे कामगार संघटनांनी सांगितले.