Chandrapur cancer care foundation चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात 100 बेडच्या कॅन्सर रुग्णालयाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी चंद्रपूर कॅन्सर फाउंडेशन या संस्थेला मुद्रांक शुल्क माफ कारण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत घेतला आहे.
महत्वाचे : चंद्रपुरात पर्यावरण युक्त डेमो हाऊस ची निर्मिती
या निर्णयामुळे रुग्णालयाच्या निर्मिती कार्याला गती प्राप्त होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने टाटा हॉस्पिटल च्या सहकार्याने भव्य कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर येथे होऊ घातले आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल ना. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आभार मानले आहेत.
Chandrapur cancer care foundation चंद्रपूर जिल्ह्यातील व लगतच्या आदिवासीबहुल क्षेत्रातील कर्क रुग्णांवर सहज उपचार करता येईल असे विशेष रुग्णालय चंद्रपूरला व्हावे अशी ना. मुनगंटीवार यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरु होता.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये
राज्य शासन, जिल्हा खनीज प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून खासगी भागीदारी तत्वावर 100 खाटांचे कर्करोग रुग्णालय चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन च्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावात त्यांनी रुग्णालयासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली 10 एकर जमीन 30 वर्षांसाठी प्रति वर्ष एक रुपया नाममात्र दराने भुईभाड्याने प्रदान केलेल्या जागेच्या करारनाम्यास मुद्रांक शुल्क भरण्यापासून सूट देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.