Chandrapur city police : मृतदेहाची ओळख पटेना

Chandrapur city police चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट परिसरात 25 मे ला रात्री 9 वाजेदरम्यान एका अज्ञात इसमाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता.

अवश्य वाचा : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत हा उमेदवार आघाडीवर, एक्जिट पोल आला समोर

मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी त्याची ओळख पटविणे सुरू केले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

6 दिवस लोटल्यावर सुद्धा त्या मृतदेहाची ओळख अजूनही पटलेली नाही.

 

Chandrapur city police मृतदेहाचे वर्णन – उंची 5 फूट, रंग – सावळा, अंगात गुलाबी कलरची टी-शर्ट त्यावर काळा पट्टा, दोरीने बांधलेला काळा पॅन्ट परिधान करून असलेला.

महत्त्वाचे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी साठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज

याबाबत शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश मोहोड पुढील तपास करीत आहे.

 

सदर मृतदेहाबाबत कुणाला काही माहिती असल्यास शहर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!