Chandrapur city : चंद्रपुरातील या भागात अपघाताचे वाढते प्रमाण

Chandrapur city चंद्रपूर – चंद्रपूरच्या ST वर्कशॉप चौक तुकूम येथे दररोज घडणाऱ्या अपघातांच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश गोखरे यांनी महानगरपालिकेकडे त्वरित गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे.

अवश्य वाचा : चंद्रपुरात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

योगेश गोखरे यांनी मनपाला दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, दुर्गापूर ते तुकूम आणि तुकूम ते दुर्गापूर या मार्गांवर वाहनांची गती नियंत्रित करण्यासाठी दोन गतिरोधकांची अत्यंत आवश्यकता आहे. हे गतिरोधक अपघातांची संख्या कमी करण्यास मदत करतील आणि नागरिकांच्या जीविताचे रक्षण करतील.

 

Chandrapur city गोखरे यांनी म्हटले, “ST वर्कशॉप चौकात अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या समस्येचे त्वरित निराकरण होणे आवश्यक आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही महानगरपालिकेला मागणी करतो की तातडीने या ठिकाणी दोन गतिरोधक बसवण्यात यावेत.”

महत्त्वाचे : हा जनतेचा विजय आहे – खासदार प्रतिभा धानोरकर

Chandrapur city चंद्रपूर महानगरपालिकेने या मागणीवर त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अन्यथा स्थानिक लोकांना सोबत घेऊन आम आदमी पार्टी चंद्रपूर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. निवेदन देताना महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर महिला अध्यक्षा तब्बसूम शेख, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभैय्या, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, जितेंद्र भाटिया, अलंकार सावळकर व इतर कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!