Chandrapur congress party : नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार

Chandrapur congress party मुल – चंद्रपूर आर्णी लोकसभेच्या निवणुकीत महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांनी २ लाख ६० हजार अशा बहुमताने विजयी झाल्या.

हा जनतेचा विजय – खासदार प्रतिभा धानोरकर

त्यांच्या विजयाबद्दल कांग्रेस कमिटी मूल तर्फे जल्लोर्षं साजरा करण्यात आला, आज मूल कांग्रेस कमिटी तर्फे खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आला.

 

Chandrapur congress party यावेळी मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे नेते सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनात वरोरा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा काँग्रेसचे महासचिव राकेश रत्नावार, माजी तालुका अध्यक्ष व माजी सभापती तथा संचालक घनश्याम येनुरकर, मुल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलंमवार, पदाधिकारी प्रशांत उराडे, माजी नगर सेविका लीना फुलझेले, सचिव शामला बेलसरे, सुरेश फुलझेले, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, विष्णू सादमवार, चिटलोजवार यांनी नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना तालुका कांग्रेस तर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व पुढील कार्यासाठी व वाटचालीसाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राकडून भरभरून शुभेच्छा दिल्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!