Chandrapur congress चंद्रपूर : केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत. यामुळे समाजातील सर्वच घटक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. मात्र, सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे.
त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी चंद्रपूर शहरातील गांधीचे उप येथे शुक्रवार दिनांक 21 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेस चिखल लावून, चिखल फेको आंदोलन करण्यात येणार आहे.
Chandrapur congress प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार आयोजित या आंदोलनाला खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष आमदार सुभाषभाऊ धोटे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांची उपस्थिती राहणार आहे.
तरी, या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी केले आहे.