Chandrapur loksabha result लोकसभा निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारांचा आज आढावा घेण्यात आला. यादरम्यान विविध प्रसारमाध्यमांचा एक्झिट पोल खोटा ठरणार असा दावा करत, आम्ही या जागेवर निवडणूक जिंकणारच असे म्हटले आहे.
निवडणूक मी जिंकणार – प्रतिभा धानोरकर यांचा दावा
एक्झिट पोलमुळे चंद्रपूरची जागा काँग्रेस पुन्हा आपल्याकडे खेचणार असे चित्र तयार झाले. मात्र पालकमंत्री मुनगंटीवार यांनी थेट सांगितले की, चंद्रपूर लोकसभा आम्ही जिंकणार असून देशात आम्ही ४०० पार तर राज्यात ४५ प्लस जाणार असा विश्वास व्यक्त केला.
आज ३ जूनला लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे जनसंपर्क सुरू होता, त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मतमोजणी प्रतिनिधींना महत्वाच्या सूचना देताना लक्ष ठेवावे असे सांगितले.
दहावी पास होणार इंजिनिअर : वाचा ही बातमी
तर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला, त्यानंतर सायंकाळी चंद्रपूर जनसंपर्क कार्यालयात मतमोजणी प्रतिनिधींशी बैठक घेत, मतमोजणीवर सर्वांनी बारकाईने लक्ष ठेवावे असे निर्देश दिले.
निकालाच्या दिवशी दोन्हीं पक्षांचे नियोजन काय?
भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी माहिती दिली की, ४ जूनला लागलेला निकाल हा देशाला कलाटणी देणारा आहे, देशात भाजप सरकार पुन्हा येणार असा विश्वास पावडे यांनी यावेळी व्यक्त केला. यंदाची ही निवडणूक आम्ही जिंकणारचं, निकाल लागल्यावर आम्ही जल्लोष करणार असे नियोजन आम्ही केले आहे.
तर काँग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांनी याबाबत सांगितले की, भाजपने अंतर्गत सर्व्हे केला असेल तो १०० टक्के फोल ठरणार आहे, ही निवडणूक आम्हीचं जिंकणार आहो.