Chandrapur police custody चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस स्टेशनमध्ये सकाळी 30 जून ला हत्या प्रकरणातील आरोपी समाधान कोळी यांनी गळफास घेत आत्महत्या केली, त्यानंतर चंद्रपूर पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडाली.
अवश्य वाचा : वरोरा पोलीस कोठडीत नेमकं घडलं तरी काय?
26 जून ला आरती चंद्रवंशी या मुलीची हत्या केल्यावर दुसऱ्या दिवशी आरोपी समाधान ला पोलिसांनी अटक केली होती, न्यायालयाने आरोपी समाधान ला 4 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली मात्र आज कुणी नसताना समाधान ने जोड्याची लेस काढत त्याने गळफास घेत आत्महत्या केली.
Chandrapur police custody पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी याबाबत दुपारी 3.30 वाजता प्रतिक्रिया दिली की, या आत्महत्या प्रकरणात जो अधिकारी कर्मचारी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.
महत्वाचे : 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत, आईने उचलले टोकाचे पाऊल
Chandrapur police custody पोलीस अधीक्षक म्हणाले की आरोपी समाधान कोळी ने 26 जून ला तरुणीचा आधी बलात्कार व नंतर तिचा खून केला, त्यानंतर आरोपीला आपल्या कृत्यावर पश्चाताप झाला, तो नैराश्यात गेला होता, त्या नैराश्यातून त्याने जोड्याच्या लेस ने आत्महत्या करीत आपलं आयुष्य संपविलं.