Chandrapur Police News : हत्येच्या आरोपीमुळे वरोरा पोलीस आली गोत्यात

Chandrapur police news चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील आनंदवन येथिल 25 वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समाधान माळी (25) या आरोपीची पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 30 जून ला सकाळी 8.30 वाजता घडली.

वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्येच आज सकाळी 8:30 च्या दरम्यान बुटाच्या लेस ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अवश्य वाचा : आईने लहान बाळाला पाजले विष

Chandrapur police news आरोपी समाधान माळी ला 4 जुलै पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती.

आरती चंद्रवंशी या तरुणीचा 26 जूनला बुधवारी घरात शिरून आरोपीने खून केला होता.
प्रेमप्रकरणातील अविश्वासातून हा खून करण्यात आला होता. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी समाधान ला 27 जून ला अटक केली होती.
आरोपीने लॉकअप मध्ये आत्महत्या केल्याने चंद्रपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सह वरोरा तहसीलदार देखील प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.

पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे मात्र आता पोलीस कोठडीत सुद्धा अश्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Chandrapur police news 29 जून ला आरोपी समाधान माळी वर बलात्काराचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता, आरती ची हत्या केल्यावर समाधान कुठेही पळून गेला नव्हता, पोलिसांनी समाधान ला आनंदवन मधून अटक केली, मात्र गुन्हा केल्यावर तो नैराश्यात गेला होता. त्या नैराश्यातून आज सकाळी त्याने स्वतःच्या जोड्याच्या लेस ने गळफास घेतला.

Maharashtra Prevention Of Defacement Of Property Act : नवशक्ती विरोधात चंद्रपूर मनपाची पोलिसात तक्रार

विशेष म्हणजे आरोपीला 24 तासाच्या आत अटक केली म्हणून पोलीस स्वतःची पाठ थोपटवीत होते मात्र आरोपीने आत्महत्या केल्यावर पोलिसांचे बोट एकमेकांवर उठत आहे. याप्रकरणात सुद्धा काही लहान पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे आरोपीचा मृत्यू झाला असा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई केल्या जाणार हे नक्की, मोठे अधिकारी मात्र यातून बचावाचा मार्ग काढणार. पोलिसांच्या चुकीमुळे सदर प्रकार घडला असून आता या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे गेला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!