Chandrapur Shocking News : चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना

Chandrapur shocking news वरोरा :- वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील एका 27 वर्षीय महिलेने आपल्या 9 महिन्याच्या बाळाला विष पाजून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी 1. 30 वाजताच्या सुमारास शेगाव येथे घडली. मृतक मातेचे नाव पल्लवी मितेश पारोधे (27) असे तर स्मित मितेश पारोधे (9 महिने) असे मुलाचे नाव आहे. स्मित वर चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अवश्य वाचा :आयुर्वेदिक दवाखाना विरोधात मनपा पोहचली पोलीस ठाण्यात

Chandrapur shocking news प्राप्त माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथील पारोधे कृषी केंद्राचे संचालक नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपुर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवती सोबत रितिरिवाजाने लग्न झाले. त्यांना 9 महिन्याचा स्मित नावाचा मुलगा आहे. शुक्रवारी दुपारी 1. 30 वाजताच्या सुमारास मितेश पारोधे यांचा मुलगा घरातच बेशुद्ध पडला होता तर पल्लवी ने गळफास लावला होता.

राजकीय बातमी : बल्लारपूर विधानसभा निवडणूक आमचा पक्ष लढणार, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट

Chandrapur shocking news ही माहिती शेगाव पोलिसांना मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत पल्लवी चा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आला पल्लवीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस करित आहे..

माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच…
मुलीच्या लग्नानंतर काही महिन्यातच सासर कडून तिला शारीरिक व मानसिक त्रास सुरु झाला होता. तिने याबद्दल आम्हाला सांगितले पण आम्ही तिला समजावून सांगत होतो. नातू झाल्यानंतर आता तरी चांगले राहतील असा विश्वास होता. मात्र दिवसेंदिवस तिला सासर कडून पैशासाठी नेहमी त्रास दिला जात होता.

 

माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून माझ्या नातवाची व माझ्या मुलीची तिचा पती,सासू घरच्या मंडळींनी हत्या केली असल्याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!