Compassionate employment चंद्रपूर : शाळेत कार्यरत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पाल्यास अनुकंपा तत्वावर नोकरी दिल्या जाते. मात्र, शाळेकडून प्रस्ताव पाठवून देखील शिक्षण विभागाकडून दप्तर दिरंगाई केली जाते. यावर चाप बसविण्याचे काम आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडून सुरू आहे. याचा आज प्रत्यय आला आणि आज पार पडलेल्या सभेत २ अनुकंपा धारकांच्या नियुक्तीस “ऑन द स्पॉट” मान्यतेचे पत्र देण्यात आले. यासह मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदांस मान्यता देण्यात आल्या. मागील वर्षी झालेल्या सभेत देखील प्रलंबित प्रकरणे रात्री ९ वाजतेपर्यंत निकाली काढण्यात आली होती. यामुळे “ऑन द स्पॉट” मान्यतेची पुनरावृत्ती झाल्याने शिक्षकांकडून आमदार सुधाकर अडबाले यांचे कौतुक करण्यात येत आहे.
अवश्य वाचा : चंद्रपुरात पर्यावरण युक्त डेमो हाऊस ची निर्मिती
Compassionate employment ‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक २६ जून २०२४ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.), पे युनिट अधीक्षक (प्राथ./माध्य.), सर्व गटशिक्षणाधिकारी, लेखाधिकारी यांच्यासोबत समस्या निवारण सभा मा. सा. कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद येथे घेतली. ही सभा दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत तब्बल नऊ तास चालली.
राज्यातील महिलांना मिळणार दरवर्षी 12 हजार रुपये
Compassionate employment माध्यमिक विभागातील वरिष्ठ / निवड श्रेणी प्रकरणे, सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते, वैद्यकीय देयके, जीपीएफ प्रलंबित तीन वर्षांच्या पावत्या पुढील सहा महिन्यात ऑफलाईन देण्यात याव्या, एनपीएस पावत्या, पदोन्नती प्रकरणे, पेंशन प्रकरणे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १४ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना पेंशन मिळण्याबाबत कार्यवाही करावी, अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ उन्नयन करणे, अनुकंपा प्रकरणे व इतर १०० च्यावर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. आमदार सुधाकर अडबाले यांनी दिलेल्या सभेच्या विषयपत्रातील बहुतांश प्रलंबित प्रकरणे सभेत निकाली काढण्यात आली. उर्वरित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना आमदार अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिल्या. देवता सुकारे व अर्जूनकर यांना अनुकंपा तत्वावर मान्यता देण्यात आली. याबद्दल त्यांनी आमदार अडबाले यांचे आभार मानले.
यानंतर प्राथमिक विभागातील सेवानिवृत्त / कार्यरत शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली. वरिष्ठ / निवड श्रेणी प्रकरणे, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची पदोन्नती प्रकरणे, संगणक वसुली न करणे, प्रलंबित गटविमा प्रकरणे व इतर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रलंबित समस्या निकाली काढण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना दिले.
Compassionate employment यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार, शिक्षणाधिकारी (माध्य.) निखिता ठाकरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गायकवाड, पे युनिट अधीक्षक वडेट्टीवार, लक्ष्मणराव धोबे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, महानगर अध्यक्ष जयंत टोंगे, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेरकी, नामदेव ठेंगणे, गडचिरोली जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, मारोतराव अतकरे, ढोरे, वर्धलवार, मिलमिले, अनिल कंटीवार, नाकाडे, सतीश मेश्राम, मनोज वासाडे, किंदरले, नितीन जीवतोडे, संध्या गोहोकार, डॉ. विजय हेलवटे, भालचंद्र धांडे, शरद डांगे, दीपक धोपटे, निलेश बेलखेडे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, हरीश ससनकर, सुरेश गिलोरकर, डॉ. अलका ठाकरे, राजू लांजेकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे सुनील दुधे, विपीन धाबेकर, दुष्यंत निमकर व विमाशी संघाचे सदस्य, जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.