Congress Celebrations चंद्रपूर : -२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर वणी आर्नी लोकसभा क्षेत्राच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना भरघोस बहुमताने विजय मिळवून देणाऱ्या खारीचा वाट असणाऱ्या म्हातारदेवी, नकोडा, घुग्गुस येथील नागरिकांचा महेश मेंढे यांनी शाल, स्मुतीचिन्ह देऊन सत्कार केला.
अवश्य वाचा : हवामान खात्याद्वारे सांगितल्या जाणाऱ्या अलर्ट चा अर्थ काय?
प्रतिभाताई धानोरकर यांनी खासदारची निवडणूक लढविली आणि तब्बल २ लाख ६० हजार मतांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या बड्या नेत्याचा पराभव केला. यात ज्या मतदार राज्याने सहभाग घेतला होता त्यांचा महेश मेंढे यांनी त्याचे गावी, घरी जाऊन सत्कार केला.
Congress Celebrations यात म्हातारदेवी येथील सरपंच सौ. संध्या पाटील, काँगेसचे ज्येष्ठ नेते संजय टिपले, उपसरपंच सावे, चटप साहेब, माधुरी मेश्राम यांचा तर नकोडा येथील हाजी शेख सनवर, माजी उपसरपंच हकीम शेख, युवा नेते राजू तीरानकर, आणि घुघुस येथील माजी सभापती रोशन पचारे, सूरज कन्नूर, तोलीक शेख,सिंनु गुडला, शेखर तंगडपेल्ली, प्रशांत सारीकर, प्रपूल हीरके, सुधाकर जाणकर, स्वागत बुरचूडे, याचा शाल व स्मुतीचीन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अवश्य वाचा : बामणी प्रोटिन्स उद्योग सुरू करा, कामगार सह कुटुंबाने सुरू केले आंदोलन
यावेळी काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्यासह रोशन रामटेके, पियुष तुपे, अविनाश मेश्राम , सचिन रणवीर, दिशांत कांबळे यांची उपस्थिती होती.