Congress party news पोभुर्णा : केंद्रीय नेतृत्व आणि प्रदेशाध्यक्ष यांचे अनुमतीने पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी वासुदेव पाल यांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली असून जिल्हाध्यक्ष यांनी केलेल्या नियुक्तीचे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. असे असतांना पक्षादेश न पाळणारी काही मंडळी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे उल्लंघन करून पक्षविरोधी कृती करीत आहेत.
या कृत्याचा पक्षाच्या निष्ठावंतावर कोणताही परिणाम पडणार नसून नवनियुक्त तालुकाध्यक्ष यांचे नेतृत्वावर आमचा विश्वास असल्याने यापुढील काळात नव्या दम आणि उत्साहाने कामाला लागणार असल्याचे मत काॅंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी ओमेश्वर पद्मगीरीवार यांनी व्यक्त केले.
Congress party news स्थानिक पत्रकार भवनात आयोजीत पत्रकार परिषदेत बोलतांना ओमेश्वर पदमगिरीवार यांनी लोकसभा निवडणुक काळात तालुकाध्यक्ष यांनी राजीनामा देवून विरोधी पक्षात प्रवेश केल्यानंतर तालुकाध्यक्ष पद रिक्त होते. त्यामूळे तालुक्यातील काॅंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मध्यें मरगळ निर्माण झाली होती. पक्षकार्ये शिवाय जनतेचे काम करतांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामूळे तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्याची मागणी लक्षात घेवून रिक्त असलेल्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांचे निर्देशान्वये पोंभुर्णा येथे काॅंग्रेस कार्यकर्त्याची बैठक आयोजीत केली.
अवश्य वाचा : बल्लारपूर विधानसभेवर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचा दावा
बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी आणि डाॅ. विश्वास झाडे यांचे उपस्थितीत तालुकाध्यक्ष पद निवडीची सभा पार पडली. सभेत झालेल्या चर्चेनुसार घनश्याम मुलचंदानी आणि डाॅ. विश्वास झाडे यांनी तालुकाध्यक्ष पदा करीता इच्छुक असलेल्यांची नांवे व सभेचा अहवाल जिल्हाध्यक्ष यांचे कडे सादर केला. प्राप्त झालेला अहवाल आणि इच्छुकांची नांवे जिल्हाध्यक्ष यांनी प्रदेश कार्यालयाकडे पाठविले. प्राप्त नांवे आणि अहवालावर चर्चा झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्व आणि प्रदेशाध्यक्ष यांचे शिफारसी नुसार जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी नुकतीच काॅंग्रेसचे ज्येष्ठ, अनुभवी आणि अभ्यासु कार्यकर्ते वासुदेव पाल यांची पोंभुर्णा तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. केलेली नियुक्ती पक्षशिस्त आणि पक्षहित लक्षात घेवून करण्यांत आली.
असे असतांना तालुक्यातील काही संधीसाधु मंडळी काही कार्यकर्त्याना हाताशी धरून पक्षात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप ओमेश्वर पद्मगिरीवार यांनी केला. सर्वानुमते झालेली तालुकाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचा विरोध करत तालुकाध्यक्ष बदलविण्यात यावा. अन्यथा पक्ष सोडण्याची भाषा बोलत निवडीच्या प्रक्रीयेसंबंधी निराधार आणि बिनबुडाचे आरोप करीत आहे. ही कृती पक्षशिस्तीचे उल्लंघन करणारी असून बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्याना हाताशी धरून काही संधीसाधु मंडळी पक्ष सोडण्याची धमकी देत आहे.
Congress party news परंतू तालुक्यातील निष्ठावंत आणि ज्येष्ठ काॅंग्रेस कार्यकर्ते सदैव काॅंग्रेस पक्षासोबत राहणार असून वासुदेव पाल यांनाच तालुकाध्यक्ष पदावर कायम ठेवण्यांत यावे व संधीसाधु मंडळींना पक्षात स्थान देण्यांत येवू नये. अशी मागणी पक्षनेतृत्वाकडे करणार असल्याचे सांगीतले. यावेळी नवनियुक्त तालुकाध्यक्ष वासुदेव पाल यांचेशिवाय माजी नगार सेलक जयपाल गेडाम, वसंत मोरे, ईश्वर पिंपळकर, दत्तु मोरे, जयदिश सेमला, राजाराम मोहुर्ले यांचेसह ४० ते ५० काॅंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.