Damini lightning alert उष्णतेची लाट सहन केल्यावर आता मान्सूनचे आगमन राज्यात होत आहे, मात्र या मान्सूनमध्ये वीज पडल्याने अनेक नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू होतात, या नैसर्गिक आपत्ती चा सर्वात जास्त धोका शेतकऱ्यांना असतो हंगामाच्या दिवशी ऊन असो की पाऊस त्यांना शेतात जावंचं लागत मात्र ही आपत्ती त्यांचा घात करतात, आता ही समस्या काही प्रमाणात दूर होऊ शकते, केंद्र सरकारने वीज पडण्याआधी नागरिकांना आधीच याची माहिती होणार असे ऐप सुरू करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : दहावी पास विद्यार्थी होणार अभियंता
राज्यात आता खरीप पेरण्या जवळ आल्या आहेत. मान्सूनला देशात सुरुवात झाली असून अनेक भागात वीज पडून शेतकऱ्यांसह अनेकांचा मृत्यू होत असल्याची वृत्त कानावर पडत आहे. भारतात दरवर्षी २ हजारांहून अधिक मृत्यू वीज पडून होतात. दरम्यान, खरीप पेरण्यांच्या दरम्यान शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या ४० किमी अंतरात वीज पडू शकते का हे आता शासनाच्या ‘दामिनी’ मोबाईल ॲपमधून कळू शकणार आहे.
Damini lightning alert भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था पुणे यांच्यामार्फत हा ॲप विकसित करण्यात आला आहे.
महत्त्वाचे : शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांसाठी शेतमजूर शौचालय
कसे कळणार आपल्या भागात वीज पडणार का?
आपल्या भागातील ४० किमी अंतरात वीज पडण्याची शक्यता कितपत आहे याची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला दामिनी हा ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करावा लागेल.
या ॲपला तुम्ही इथूनही डाऊनलोड करू शकता..‘Damini: Lightining Alert’ असे या ॲपचे नाव आहे.
हा ॲप डाउनलोड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमची प्राथमिक माहिती भरावी लागेल. यात आपले नाव, मो. नं, पत्ता, पिनकोड, व्यवसाय याचा समावेश असेल.