DTE Engineering Diploma Course : दहावी पास विद्यार्थी होणार इंजिनिअर

DTE Engineering Diploma Course दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाने म्हणजेच डीटीईने इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

प्रवेश प्रक्रियेला बुधवार २९ मे २०२४ पासून सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २५ जून २०२४ आहे.

अवश्य वाचा : स्मार्ट वीज मीटर योजना

प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी :

उमेदवारांनी वेळापत्रकानुसार https://poly24.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ओंलीण अर्ज सादर करावेत. उमेदवार मोबाईलद्वारे Android किंवा IOS स्टोअरवरून “DTE Diploma Admission” हे App डाउनलोड करून त्याद्वारेदेखील अर्ज भरून निश्चित करू शकतात.
ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / युपीआय / नेट बँकिंगद्वारे उमेदवारांना खाली नमूद केलेले अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क ना-परतावा पद्धतीचे आहे.

अर्ज शुल्काविषयी :

■ महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण प्रवर्ग, महाराष्ट्र राज्याबाहेरील (OMS), जम्मू व काश्मीर संघराज्य क्षेत्र आणि लडाख संघराज्य क्षेत्र मधून विस्थापित उमेदवार : ४०० रुपये DTE Engineering Diploma Course

■ फक्त महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्ग उमेदवार [SC, ST, VJ/DT-NT(A), NT(B), NT(C), NT (D), OBC, SBC, SEBC, EWS] आणि दिव्यांग उमेदवार : ३०० रुपये

केंद्रिय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील महत्वाच्या तारखा :

● प्रवेशप्रक्रियेसाठी उमेदवारांद्वारे वेबसाइटवरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन कागदपत्र अपलोड करणे (महाराष्ट्र राज्य / अखिल भारतीय / जम्मू-काश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी)- २९ मे २०२४ ते २५ जून २०२४

● प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे १. ई-स्क्रूटनी पद्धत निवडलेल्या उमेदवारांसाठी २. प्रत्यक्ष स्क्रूटनी पद्धत निवडलेल्या उमेदवारांसाठी- २९ मे २०२४ ते २५ जून २०२४
● तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे- २७ जून २०२४
● सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी : तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये तक्रार असल्यास, त्या सादर करणे- २८ जून २०२४ ते ३० जून २०२४
● अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे- २ जुलै २०२४

पात्रता निकष :

◆ उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
◆ उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डकडून SSC (10वी) परीक्षा किमान ३५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
◆ 2024 मध्ये SSC परीक्षा देणारे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

महत्त्वाचे :

उमेदवारांनी महाराष्ट्र तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा. उमेदवारांनी अर्ज फॉर्ममध्ये निर्दिष्ट केलेले आवश्यक दस्तऐवज आणि प्रमाणपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी. DTE Engineering Diploma Course

उमेदवारांनी दस्तऐवज पडताळणी आणि त्यांचे अर्ज फॉर्म पुष्टी करण्यासाठी नियुक्त सहाय्य केंद्रांवर भेट द्यावी. उमेदवारांनी मूळ दस्तऐवजांसह स्व:साक्षांकित छायांकित प्रत एक संच पडताळणीसाठी आणावे. DTE Engineering Diploma Course

पदभरती : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात पदभरती

उमेदवारांनी SSC परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
गुणवत्ता यादी आणि उमेदवारांनी भरलेल्या पर्यायांच्या आधारे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) मार्फत आसन वाटप केले जाईल.

महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार प्रवेश प्रक्रियेसाठी आरक्षण धोरणे लागू होतील. राखीव श्रेणीतील उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेदरम्यान वैध श्रेणी प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!