Elements of flood risk पावसाळ्यात चंद्रपूर शहरातील काही भागात भयावह पुरजन्य स्थिती निर्माण होते, मात्र त्यावर आजपर्यंत काही उपाययोजना करण्यात आल्या नाही, दरवर्षी आलेल्या कृत्रिम पुराने नागरिकांचे नुकसान होते, त्यामुळे या कृत्रिम पुरापासून शहरातील काही भाग वाचवायचे असेल तर AIMIM ने प्रशासनाला 20 फूट उंच भिंत बांधण्याचा उपाय सुचविला आहे. याबाबत AIMIM ने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना निवेदन सुद्धा दिले आहे.
अवश्य वाचा : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले चंद्रपूर जिल्हा प्रशासन
Elements of flood risk शहरातील पठाणपुरा, सिस्टर कॉलोनी व रहमत नगर भागात पावसाच्या पाण्याने पूर येतो, त्यासाठी पठाणपुरा ते नदी पात्र पर्यंत गोंड कालीन किल्ल्यासारखी दगडाची तब्बल 20 फूट उंच भिंत बांधावी, जेणेकरून सदर भिंत पुराच्या पाण्याचा प्रवाह थांबविणार, कारण चंद्रपूर शहर हे गोंड कालीन किल्ल्याच्या आत वसलेलं आहे, किल्ल्याच्या भिंतीमुळे शहरात पुराचे पाणी शिरकाव करू शकत नाही.
त्याप्रमाणे चंद्रपूर प्रशासनाने 20 फूट उंच ऐतिहासिक भिंतीचे बांधकाम करून नागरिकांना पुरापासून संरक्षण देण्याचे काम करावे अशी मागणी AIMIM जिल्हाध्यक्ष अमान अहमद व शहर अध्यक्ष अजहर शेख यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना केली आहे.