Farm labor toilet in Chandrapur अंबुजा फाउंडेशन, उपरवाही उत्तम कापूस प्रकल्पाअंतर्गत रजनी खानोरकर यांच्या मार्गदशनाखाली सुमठाना या गावी शेतकरी विठ्ठल उमरे व सौ. प्रांजली उमरे यांच्या शेतात शेतमजूर शौचालय बांधण्यात आले.
अवश्य वाचा : चंद्रपुरात भीषण अपघात, दोघे ठार
शेतात येणारे महिला पुरुष मजूर यांना शौचास जाण्यास अडचणी होतात. त्याचप्रमाणे त्यांची सुरक्षा हेतू व एक उत्तम काम म्हणून शेतामध्ये शेतमजूर शौचालय बांधून आज त्याचे उत्तम उदाहरण शेतकऱ्यांनी दिलं आहे.
महत्त्वाचे : हा विजय जनतेला समर्पित – खासदार प्रतिभा धानोरकर
Farm labor toilet in Chandrapur शेतमजूर शौचालय सोबत महिलांना मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड व हँडवॉश करण्यासाठी साबुन याची देखील व्यवस्था शेतमजूर शौचालयास मध्ये ठेवण्यात आली.
महिला उघड्यावर किंवा धुरा बांधावर शौचास जाण्यास अडचणी होतात व महिला वेळ काढ किंवा उशिरा शौचास झाल्याने महिलांमध्ये अनेक आजार हे वाढत होताना दिसतात त्याच अनुषंगाने एक उत्तम काम म्हणून महिलांसाठी व पुरुषांसाठी एकूणच शेतात येणाऱ्या शेतमजूर सर्वांसाठी शौचालयाची निर्मिती करण्यात आली.
अवश्य वाचा : तब्बल 60 वर्षांनी चंद्रपूर लोकसभेला मिळाली महिला खासदार
Farm labor toilet in Chandrapur या उपक्रमाला उपस्थित शेतकरी महिला शेतकरी व पुरुष शेतकरी तसेच गावातील उपस्थित- उपसरपंच सौ. अनुताई प्रमोद ताकसांडे व मुक्ताई गटातील सर्व तेराही सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित शेतकरी गणपत बल्की , नीलकंठ बोबडे, विनोद देवतळे, प्र. अ. रजनी खानोरकर, हे उपस्थित होते.