Flood of unemployment आपलं गाव आणि घर सोडून, मैलोनमैल प्रवास करत, मोठ्या शहरात तरुण डोळ्यांत खाकी वर्दीचे स्वप्न आहे.
या तरुणांच्या स्वप्नांची वाट यंदा खडतर बनून गेली आहे. कारण पोलीस भरतीसाठी आलेल्या अर्जांची संख्या.. पोलीस खात्यातील एका जागेसाठी 101 अर्ज आले आहेत.
अवश्य वाचा : neet परिक्षेविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
Flood of unemployment राज्यभरात आजपासून 17 हजार 471 जागांसाठी पोलिस भरती सुरू होत असून यासाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आलेले आहेत.
Flood of unemployment पोलीस खात्यात शिपाई पदासाठी बारावी तर चालक आणि बॅण्ड पथकात भरतीसाठी शिक्षणाची अट इयत्ता दहावी उत्तीर्ण इतकी आहे. तरी अत्यंत उच्चशिक्षित तरुणांनीही या पदांसाठी अर्ज केले आहेत. डॉक्टर, इंजिनीअर अगदी एमबीए केलेल्या तरुणांनीही पोलीस भरतीसाठी अर्ज केले आहेत.विशेष म्हणजे अनेक उच्चशिक्षित उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. अगदी डॉक्टर, व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभियांत्रिकी पदवी (बीटेक), विधि पदवी (एलएलबी) झालेले उमेदवारही स्पर्धेत आहेत.
महत्त्वाचे : पोलीस भरती मध्ये आलेल्या उमेदवारांना आमिष दिल्यास कारवाई अटळ – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन
कोणत्या जागेसाठी किती अर्ज?
पोलीस शिपाई – 9 हजार 595 पद असून 8 लाख 22 हजार 984 अर्ज आलेले आहेत.
चालक पदासाठी – 1 हजार 686 पदांसाठी, 1 लाख 98 हजार 300 अर्ज आलेत.
बँड्समन – 41 पद असून 32 हजार 26 अर्ज आलेले आहेत.
एसआरपीएफ – 4 हजार 349 जागा असून 3 लाख 50 हजार 592 अर्ज आलेले आहेत.
तुरुंग शिपाई – 1 हजार 800 पदांसाठी 3 लाख 72 हजार 354 अर्ज आलेले आहेत.
Flood of unemployment बँड पथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा पोलिस शिपाई, चालक, बँड्समन, शीघ्र कृती दलातील पदे आणि तुरूंग विभागातील पदांसाठी भरती होत आहे. त्यातील बँडसमन म्हणजेच पोलिसांच्या बँड पथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा असल्याचे दिसत आहे. या पदासाठी 41 जागा आहेत. त्यासाठी 32 हजार 26 अर्ज आले आहेत.या पदाच्या एका जागेमागे 781 उमेदवार स्पर्धेत आहेत. राज्यातील पोलिस भरती बुधवारपासून सुरू होत असून सुरूवातीला मैदानी चाचणी नंतर शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे.
भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी
एका पदासाठी एकशे एक अर्ज… अशी सगळी परिस्थिती असताना, अनेक भागांत पाऊस पडत असल्याने भरती पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येतेय. तर, भरती प्रक्रियेदरम्यान पाऊस आल्यास भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात येईल. तसेच अनेक पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन्ही ठिकाणी एकच तारीख मिळाली असल्यास ती तारीख बदलून दिली जाईल, अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिलीय.
प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या बेरोजगारीमुळे यंदाची पोलीस भरती म्हणजे एक फुल, लाखो माली… अशी गत होऊन बसलीय.