Forest Department Chandrapur : वनविभागाचा तो खड्डा जीवघेणा ठरला

Forest Department Chandrapur चंद्रपूर शहरातील लालपेठ भागात 15 वर्षीय मुलाचा वनविभागाच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 2 जून ला घडली. मृतक मुलाचे नाव 15 वर्षीय तनविर शेख रहमान असे असून तो मेजर गेट दुर्गापूर येथे राहणारा होता.

अवश्य वाचा : स्मार्ट वीज मीटर योजना काय आहे?

Forest Department Chandrapur आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास मृतक तनविर शेख हा आपल्या मित्रांसोबत 16 वर्षीय आर्यन साईनाथ यलगमवार रा. दादमहल, 16 वर्षीय कृष्णा जितेंद्रकुमार साहू रा.भिवापूर व 20 वर्षीय सकलेन हमीद खान पठाण, भिवापूर हे चौघे आपल्या 2 दुचाकीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील लालपेठ जाणाऱ्या मार्गावरील असलेल्या बंकर जवळ गाडी धुण्यासाठी गेले.

 

त्यानंतर जवळ असलेल्या वनविभागाच्या खड्ड्यात तनविर पोहण्यासाठी गेला, तनविर सोबत आर्यन व कृष्णा हे दोघे त्या खड्ड्यात उतरले, मात्र सकलेन ने त्यांना खड्ड्यात जाऊ नका असे सांगितले होते.

 

मात्र तिघांनी सकलेन चे म्हणणे ऐकले नाही, काही वेळात आर्यन व कृष्णा दोघे परत आले मात्र तनविर बाहेर आला नसल्याने तिघांची घाबरगुंडी उडाली, त्यांनी मदतीसाठी अनेकांना बोलाविले.

अवश्य वाचा : चंद्रपूर लोकसभा एक्जिट पोल

Forest Department Chandrapur लालपेठ परिसरातील नागरिक काही वेळात त्याठिकाणी जमा झाले, पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली असता शहर पोलीस त्याठिकाणी दाखल झाले, तनविर चा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले, पथक प्रमुख अशोक गरगेलवार यांनी बोटीच्या साहाय्याने तनविर चा शोध केला, तब्बल 2 तासांनी पोलिसांच्या बचाव पथकाला यश मिळाले. तनविर चा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

 

मृतदेह बाहेर काढल्यावर तनविर च्या कुटुंबाने टाहो फोडला, तनविर हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

 

Forest Department Chandrapur याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगामकर यांच्याशी सम्पर्क साधला असता त्यांनी त्या खड्ड्याबाबत माहिती दिली की त्याठिकाणी गवत विकास केंद्र सुरू होणार होते मात्र काही दिवसांपूर्वी तो प्रकल्प रखडला, त्या प्रकल्पासाठी वनविभागाच्या जागेवर आम्ही काम केले, आता त्याच ठिकाणी भारत माता प्रकल्प सुरू होत आहे, ज्या खड्ड्यात तनविर चा मृत्यू झाला, त्यामध्ये वेकोलीच्या खाणी चे पाणी आम्ही खड्ड्यात सोडले.

 

जंगलाला तो भाग लागून असल्याने पाण्याच्या शोधात असलेले जनावरे त्याठिकाणी पाणी प्यायला यायचे, मात्र काही दिवसांपासून काही टवाळखोर वनविभागाच्या त्या खड्ड्याजवळ पोहण्यासाठी येत होते, आम्ही अनेकदा त्यांना हाकलून लावले, नंतर सुरक्षिततेसाठी आम्ही त्या परिसरात फेंसिंग लावली, मात्र 2 दिवसात फेंसिंग चोरीला गेली.

 

आता भारत माता हा प्रकल्प त्याठिकाणी सुरू होत आहे, खड्ड्यात साचलेलं पाणी आम्ही तिथे लावण्यात येणाऱ्या वृक्षांना देणार होतो.
सदर घडलेली घटना ही दुःखद आहे, त्या ठिकाणी बाहेरचे कुणी यायला नको यासाठी ठोस उपाययोजना काही दिवसात करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर यांनी दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!