गुरू गुरनुले
Gharkul construction मुल – मुल तालुक्यातील एमआयडीसी मरेगाव परिसरात पाण्याच्या टाकी समोर मोठ्या प्रमाणावर अवैद्य रेतीसाठा जमा करून ठेवला आहे. सदर रेतीसाठा विषयी माहिती जाणून घेतली असता एम.आय.डी.सी. परिसरात सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात जवळपास अंदाजे ५० हायवा रेतीसाठा करून ठेवला आहे. सदर कंत्राटदाराने या रेतीसाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी अथवा शासनाकडून परवानगी घेतलेली नाही. याविषयी दिनांक ८ जून २०२४ रोजी तहसीलदार साहेब यांना मोबाईल द्वारे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांचे मार्गदर्शनात शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार तक्रार स्वरूपात माहिती तथा रेतीसाठ्याचे व्हिडिओ क्लिप पाठवली असता तहसीलदार यांचे कडून अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नाही.
अवश्य वाचा : नीट परिक्षेविरोधात चंद्रपुरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
ही बाब अत्यंत गंभीर असून महसूल विभाग विषयी शंका व्यक्त केली जात आहे. संबंधित कंत्राटदार आणि महसूल विभाग यांचेमध्ये काहीतरी साठे-लोटे असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे शासनाने ग्रामीण जनतेसाठी अनेक घरकुल योजना राबविण्याचे ठरविले असताना घरगुती घरकुल बांधकाम करणाऱ्यांना किंवा इतरही शासकीय काम करणाऱ्यांना रेती उपलब्ध होत नाही.
महत्त्वाचे : पोलीस भरतीसाठी उमेदवारांना आमिष द्याल तर याद राखा – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन
Gharkul construction गरीब गरजू लोकांना घरकुल मंजूर झाले असताना रेती अभावी त्यांचे घरकुल बांधकाम अडून पडले आहे तर काहींचे अर्धवट झाले आहेत. ही बाब शासनाच्या उद्देशांना हरताळ फासणारी आहे. तर दुसरीकडे अशा कंत्राटदारांकडे मोठ्या प्रमाणात अवैध रेती साठा कसा काय उपलब्ध झाला. याबाबत तर्क वितर्क लावल्या जात आहे. या संबंधाने शिवसेनेच्या वतीने दिनांक १८/६/२०२४ ला तक्रार दिलेली असता.ही बाब अतिशय निषेधार्थ असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याबाबत तालुका शिवसैनिकांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार मुल यांना निवेदनातून विनंती केली असून सदर रेतीची लिज नसतांना रेती आली कुठून, करीता रेती साठ्याबाबत संबंधित कंत्राटदाराविरोधात तात्काळ शासकीय नियमानुसार तात्काळ कठोर कारवाई करून सदर रेती साठा जप्त करावा, आणि ही रेती घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
अवश्य वाचा : चंद्रपूर विधानसभेतील सिंचनाचा प्रश्न सुटणार
Gharkul construction आपणाकडून सदर विषयावर तातडीने कारवाई न झाल्यास शिवसेना तालुका मूलच्या वतीने आपल्या शिवसेना स्टाईलने सदर प्रकरण हाताळल्या जाईल आणि यात कायदा सुव्यवस्थेचं प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहणार.असा इशारा यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांनी दिला.यावेळी शिवसेना शहर प्रमुख आकाश राम,युवासेना शहर प्रमुख आमित आयलानी,दादाजी लोडेलिवांर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.