Horrible accident in Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना-गडचांदुर मार्गावर 5 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मृतक हे कोरपना तालुक्यातील खडकी, रायपुर येथील रहिवासी होते, समीर मडावी व प्रियांका झित्रु कुलसंगे असे मृतकाचे नाव आहे.
Horrible accident in Chandrapur सदर अपघात हा सोनूर्ली गावाजवळ घडला, समीर व प्रियंका गडचांदूर येथे बँकेत काही कामानिमित्त आले होते, दोघे दुचाकीने परतीच्या वाटेवर असताना कोरपना गडचांदूर मार्गावरील सोनूर्ली गावाजवळ समोरून कोळसा वाहतूक करणारा ट्रक क्रमांक mh34 ab 1173 याने समोरून समीर च्या दुचाकीला धडक देत तब्बल 50 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले.
अपघात इतका भीषण होता की दोघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, अपघात स्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
मागील अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे, रस्ता खराब असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने नियंत्रित गतीमध्ये वाहन चालवितात मात्र कोळसा वाहतूक करणारे ट्रक हे बेभान होत वाहन चालवितात.